कोरोबाबत पुण्यात अफवा पसरवण्यावर गुन्हा दाखल

पुणे | कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होती आहे. तसंतसं अफवाही जोरजोरात पसरायला सुरूवात झाली आहे. कोरोनाबद्दलच्या अनेक अफवा समाजमाध्यमांवर पसरवल्या जात आहे. पुण्यात अशाच एका अफवा पसरवणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला गेला आहे.

पुण्यातल्या एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये कोरोनाचा रूग्ण आहे, अशी अफवा एका समाजकंटकाने पसरवली होती. मात्र पुण्याचे विभागीय आयुक्तांनी याची तपासणी केली. त्यानंतर असा कुठलाही रूग्ण आढळलेला नाही, असं त्यांच्या लक्षात येताच त्यांनी संबिधातावर कारवाई केली आहे. कोरोगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला गेला आहे.

देशभरासह महाराष्ट्रात देखील कोरोनाच्या रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. देशात 100 हून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे तर महाराष्ट्रात हा आकडा 32 वर पोहचला आहे.

दरम्यान, पुण्यात काही ठिकाणी जमावबंदी करण्याचा शासन विचार करत आहे. काळजी करू नका मात्र काळजी घेण्याचं आवाहन प्रशासन वारंवार करत आहे.

महत्वाच्या बातम्या-

“शरद पवारांनी तीन टर्ममध्ये 40 पैकी 38 गोष्टी पूर्ण केल्या”

-मल्हारराव होळकरांच्या जयंतीनिमित्त राम शिंदेंकडून झाली ही मोठी चूक

-“…तसं आदित्य ठाकरेंना खुश करण्यामध्ये अजित पवारांसह सर्वांचं भलं”

-ब्राम्हण समाजाला दुखवण्याचा माझा उद्देश नव्हता- नितीन राऊत

-“कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महापालिकेची निवडणूक पुढे ढकला”