Deltacron: चीनमुळे भारताला चौथ्या लाटेचा धोका?, ICMR ने दिला ‘हा’ गंभीर इशारा

नवी दिल्ली | मागील तीनही लाटेत कोरोनाने (Corona) देशभर धुमाकूळ घातला होता. तसेच जगभरात देखील आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण झाल्याचं पहायला मिळालं होतं. अशातच आता अनेक देशांवर कोरोनाच्या नव्या लाटेचं संकट ओढावत आहे.

फ्रान्स, इटली, जर्मनी, दक्षिण कोरिया, अमेरिका, इंग्लंड, डेन्मार्क, रशिया इत्यादी देशांमध्ये दररोज हजारो कोरोना बाधित रुग्ण आढळत आहेत. तर भारताचा शेजारी देश चीनमध्ये देखील कोरोनाने धुमाकूळ घातल्याचं पहायला मिळतंय.

कोरोनाचा नवा डेल्टाक्राॅन (Deltacron) व्हेरियंट सध्या जगभर थैमान घालत असल्याचं पहायला मिळतंय. चीनमध्ये मोठ्या प्रमाणात आढळणाऱ्या डेल्टाक्राॅन व्हेरियंटमुळे आता भारताची चिंता वाढली आहे. त्यावर आता तज्ज्ञांनी मत व्यक्त केली आहेत.

सध्या भारतासाठी घाबरण्यासारखे काही नाही, मात्र चीनमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढले तर भारतासाठी चिंताजनक परिस्थिती निर्माण होऊ शकते, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

भारतीयांना घाबरण्याची गरज नाही. याची अनेक कारणे आहेत. भारतातील लस कव्हरेज देखील खूप चांगलं आहे. याशिवाय, मोठ्या संख्येने लोक आधीच ओमिक्राॅन बाधित झाले आहेत, असंही आयसीएमआरच्या तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

दरम्यान, भारतात लसीकरण मोठ्या प्रमाणात झालं असल्याने कोरोनाच्या पुढील लाटेचा धोका कमी असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, त्याबरोबरच मास्कसह नियमांचं पालन करणं देखील तितकंच गरजेचं देखील आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

काय सांगता! Russia-Ukrain युद्धादरम्यान अमेरिकेनं केली चक्क रशियाला मदत; झालं असं की…

 Railway Recruitment 2022: परीक्षेविना रेल्वेमध्ये भरती होणार; 10वी पासही करू शकतात अर्ज

“सदाभाऊंच्या बुडाला का आग लागली हे शोधणं महत्त्वाचं” 

“सत्ता गेल्यामुळे महाविकास आघाडीवर भाजपची काळी नजर” 

“शरद पवारांचं आडनाव आगलावे करा, त्यांनी आयुष्यभर काड्या लावायचं काम केलं”