Corona: महाराष्ट्र कोरोनामुक्त होतोय! वाचा राज्याची आजची ताजी आकडेवारी

मुंबई | कोरोना (Corona) हळूहळू आटोक्यात येत असलेला पहायला मिळत आहे. त्यामुळे परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. अशातच देशातील कोरोना रूग्णांबाबत सकारात्मकता निर्माण झाली आहे.

आटोक्यात आलेला कोरोना पाहता अजून जास्त दिवस निर्बंध राहणार नसल्याचं चित्र आहे. त्यामुळे नागरिकांनाही काहीश्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

राज्यात रुग्णसंख्या आज एक हजारांखाली आली आहे. त्यामुळे आता आरोग्य व्यवस्थेवरील ताण कमी झाल्याचं पहायला मिळतंय.

राज्यात सध्या 939 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. आज राज्यात 119 रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच गेल्या चोवीस तासात 2 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण 78,73,841 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.11% झाले आहे.

सध्याची कोरोना स्थिती आटोक्यात येत असल्याचं चित्र पहायला मिळत आहे. देशातील कोराना रूग्णांबाबत सकारात्मकता निर्माण झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

Ravi Rana: “आयुक्त आरती सिंह यांनी मुख्यमंत्र्यांकडून सुपारी घेतली”

“2 वर्षात तब्बल 19 लाख EVM गायब”, शशी थरूर यांचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल

 Russia-Ukrain War: “युक्रेनला सांगा मी त्यांना पुर्णपणे बर्बाद करेन”; पुतिनच्या धमकीनं जग हादरलं

  मास्कमुक्तीच्या निर्णयाविषयी राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

  नारायण राणेंच्या अडचणींत पुन्हा वाढ; ‘ते’ प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात