Corona Update: राज्यातील आजच्या आकडेवारीनं नागरिकांना दिलासा, पाहा आकडेवारी

मुंबई | कोरोना (corona) हळूहळू आटोक्यात येत असलेला पहायला मिळत आहे. त्यामुळे परिस्थीती पूर्वपदावर येत आहे. अशातच देशातील कोरोना रूग्णांबाबत सकारात्मकता निर्माण झाली आहे.

आटोक्यात आलेला कोरोना पाहता अजून जास्त दिवस निर्बंध राहणार नसल्याचं चित्र आहे. त्यामुळे नागरिकांनाही काहीश्या प्रमाणात दिलासा आहेच.

राज्यात रुग्णसंख्या आज एक हजारांखाली आली आहे. त्यामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

राज्यात सध्या 964 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. आज राज्यात 110  रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच गेल्या चोवीस तासात एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला नाही.

राज्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण मुंबईमध्ये आहेत. मुंबईत  290 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. त्या खालोखाल  अॅक्टिव्ह रुग्ण ठाण्यात आहे. ठाण्यात 164 अॅक्टिव्ह रुग्ण आहे.

देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत कोरोना लसींचे सुमारे 170 कोटी डोस देण्यात आले आहेत. आतापर्यंत लसीचे 170 कोटी 87 लाख 6 हजार 705 डोस देण्यात आले आहेत.

सध्याची कोरोना स्थिती आटोक्यात येत असल्याचं चित्र पहायला मिळत आहे. देशातील कोराना रूग्णांबाबत सकारात्मकता निर्माण झाली आहे.

सर्व नागरिकांनी लसीकरण मोहिमेत सहभाग नोंदवत लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करून घ्यावं, असे आवाहन केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे करण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  “अडीच वर्षांत केवळ अपमान होणार असेल तर साहेबांनी विचार करायला हवा”

मोठी बातमी! चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ  

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा! 

“काँग्रेस बाप आहे आणि बापच राहणार” 

डिजीटल मीडिया पत्रकारिता पुरस्काराने ‘थोडक्यात’चा सन्मान; कृष्णा वर्पेंचा गौरव