नवी दिल्ली | कोरोना (Corona) महासाथीच्या रोगामुळे संपूर्ण जगावर गंभीर परिणाम झालेला पहायला मिळाला. त्यामुळे सगळीकडे जनजीवन विस्कळीत झालेलं होतं.
आता हळूहळू कोरोना आटोक्यात येत आहे. नागिरकांनाही काहीश्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे. काही ठिकाणी कोरोना निर्बंधही हटवण्यात आले आहेत.
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आल्यानंतर राज्य सरकार अनलॉक जाहीर केलं. मात्र चीनमध्ये (China) अलीकडच्या काळात कोरोना शिरकावर वाढत असल्याचं पहायला मिळत आहे.
चीनमध्ये 13,146 कोविड प्रकरणे नोंदली गेली आहेत, जी जवळजवळ दोन वर्षांपूर्वी पहिल्या लाटेच्या नंतरची सर्वाधिक प्रकरणे आहेत.
चीनमधील शांघाय शहरात कोरोनाचा शिरकाव वाढत असून एकाच दिवसात विक्रमी 8226 प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत.
शांघायमध्ये आजपासून पाच दिवसांच्या निर्बंधांसह शहराच्या 26 दशलक्ष लोकसंख्येला लॉकडाऊन लावावं लागत आहे.
सर्गामुळे नवीन मृत्यूची नोंद झाली नाही. त्याचवेळी शांघायमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे, असं आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“राज ठाकरेंच्या तुंबलेल्या मोरीतून भाजपचे गांडूळ निघाले”
“राज ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर मी 200 टक्के सहमत”
एसटी कर्मचाऱ्यांना अजित पवारांचं पुन्हा आवाहन, म्हणाले…
राज ठाकरेंना अक्कलदाढ उशीरानं आली – संजय राऊत
पाकिस्तानात मोठा ड्रामा; ‘संसद बरखास्त करा’, इम्रान खान यांची राष्ट्रपतींना शिफारस