नवी दिल्ली | दीड महिन्यांचा लॉकडाऊन असून देखील कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासांतला कोरोना रूग्णांच्या आणि मृत्यूंच्या संख्येने देशातला आतापर्यंतचा विक्रम मोडला आहे.
गेल्या 24 तासांत देशात 3875 नवे कोोरनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे भारतातील कोरोनाबाधित रूग्णांची संख्या आता 46711 इतकी झाली आहे, अशी माहिती केंद्रिय आरोग्य विभागाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे.
दुसरीकडे गेल्या 24 तासांत देशात 194 रूग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. यामुळे भारतातली बळींची संख्या आता 1583 वर जाऊन पोहचली आहे.
महाराष्ट्रात करोनाचे 841 नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 24 तासात 34 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्राची रुग्णसंख्या 15 हजार 525 इतकी झाली आहे. मुंबईची रुग्णसंख्या जवळपास 10 हजाराला टेकली आहे. महाराष्ट्रासाठी ही चिंता वाढवणारी बातमी आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यातील ‘गोल्ड’मॅन कायमच हरले आयुष्याची लढाई
-“लॉकडाऊनचा निर्णय नोटबंदीसारखा न घेता देशाला वेळ द्यायला हवा होता”
-पुण्याचे गोल्डमॅन सम्राट मोझे यांचं निधन
-योगी सरकारने स्थलांतरित मजुरांबाबत घेतलेला निर्णय माणुसकीला धरून नाही- संजय राऊत