सावधान! राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत आजही लक्षणीय वाढ, वाचा आकडेवारी

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत सातत्याने होणारी वाढ पुन्हा एकदा धडकी भरवणारी आहे.

कोरोनाबाधितांच्या आकडेवारीने सर्वांचीच चिंता वाढवली आहे. आरोग्य विभागाकडून ताजी आकडेवारी जारी करण्यात आली असून गुरूवारी 255 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे.

राज्यातील सक्रीय कोरोना रूग्णांची संख्या आता 20 हजारांच्या पुढे गेली आहे. राज्यातील सर्वात जास्त कोरोना रूग्ण मुंबईत आढळल्याने मुंबईकरांची चिंता वाढली आहे.

राज्यातील एकूण कोरोना रूग्णसंख्येच्या 70 टक्के सक्रिय रूग्ण हे मुंबईत आहेत. त्यामुळे मुंबईत पुन्हा एकदा कोरोनाची दहशत पाहायला मिळत आहे.

राज्यात आज 4255 कोरोना रूग्ण आढळून आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. तर यातील अर्ध्यापेक्षा जास्त कोरोनाबाधित हे मुंबईत आढळून आले आहे.

मुंबईत आज 2366 नवे कोरोना रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे मुंबईतील सक्रिय कोरोना रूग्णांची संख्या आता 17 हजार 5 वर जाऊन पोहोचली आहे.

दरम्यान, मुंबई पाठोपाठ ठाणे, नवी मुंबई, पनवेल, वसई विरार आणि पुणे या भागात जास्त प्रमाणात कोरोना रूग्ण आढळून आले आहेत. राज्यातील कोरोनाबाधितांचा वाढता आलेख बघता सरकारकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

“20 जूनला देवेंद्र फडणवीस पुन्हा चमत्कार करणार”

“पंकजा मुंडेंनी स्वत:चा पक्ष स्थापन केला तर राजकीय भूकंप येईल”

मोठी बातमी! केतकी चितळेचा जामीन मंजूर मात्र मुक्काम अद्यापही तुरूंगातच

“संजय राऊतांच्या अंगात आलं म्हणूनच महाविकास आघाडी स्थापन झाली”

इम्तियाज जलील यांचा पंकजा मुंडेंसमोर स्वतंत्र पक्षाचा प्रस्ताव, म्हणाले…