मुंबई | कोरोना महासाथीच्या रोगानं जगभरात हाहाकार माजवला आहे. या महासाथीनं सगळंच विस्कटून टाकलेलं पहायला मिळालं. मात्र आता कोरोना कमी होत आहे.
कोरोनाचा शिरकाव नियंत्रणात येत असल्यामुळे आता निर्बंधही शिथिल केले आहेत. महाराष्ट्रात तर अनलाॅकही करण्यात आलं आहे. गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर निर्बंधमुक्त राज्य केलं आहे.
आज देखील सक्रिय रुग्णसंख्या एक हजारांखाली आली आहे. राज्यात सध्या 921 सक्रिय रुग्ण आहे. आज राज्यात 117 रुग्णांची नोंद झाली आहे.
राज्यात आज दोन कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.87 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 77,25, 684 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
गेल्या चोवीस तासात दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 131 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. सध्याची कोरोना स्थिती आटोक्यात येत असल्याचं चित्र पहायला मिळत आहे. देशातील कोराना रूग्णांबाबत सकारात्मकता निर्माण झाली आहे.
सर्व नागरिकांनी लसीकरण मोहिमेत सहभाग नोंदवत लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करून घ्यावं, असे आवाहन केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे करण्यात येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘भाजपला राज ठाकरेंना सोबत घेणं परवडणारं नाही’; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
“शरद पवार यांच्यावर मी Phd करतोय, इतक्या जास्त वयात ते…”
“देवेंद्रजी, तुम्ही थोडं अडजेस्ट केलं तर….”; काॅंग्रेसचा घणाघात
“पहिल्यांदा तुमचा मुलगा अमित ठाकरे यांना हनुमान चालिसा म्हणायला लावा”
Corona Update: ‘या’ ठिकाणी कोरोनाच्या रुग्णसंख्येत दुपटीनं वाढ