Corona Update: आज राज्यात ‘इतक्या’ नव्या रुग्णांची नोंद, वाचा आकडेवारी

मुंबई | कोरोना महासाथीच्या रोगानं जगभरात हाहाकार माजवला आहे. या महासाथीनं सगळंच विस्कटून टाकलेलं पहायला मिळालं. मात्र आता कोरोना कमी होत आहे.

कोरोनाचा शिरकाव नियंत्रणात येत असल्यामुळे आता निर्बंधही शिथिल केले आहेत. महाराष्ट्रात तर अनलाॅकही करण्यात आलं आहे. गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर निर्बंधमुक्त राज्य केलं आहे.

आज देखील सक्रिय रुग्णसंख्या  एक हजारांखाली आली आहे. राज्यात सध्या 803 सक्रिय रुग्ण आहे.आज राज्यात 132  रुग्णांची नोंद झाली आहे.

राज्यात आज सहा कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.87 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 77,26, 461  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्के झाले आहे. राज्यात आजपर्यंत 7, 96, 66, 245  प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.

सर्व नागरिकांनी लसीकरण मोहिमेत सहभाग नोंदवत लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करून घ्यावं, असे आवाहन केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे करण्यात येत आहे.

सध्याची कोरोना स्थिती आटोक्यात येत असल्याचं चित्र पहायला मिळत आहे. देशातील कोराना रूग्णांबाबत सकारात्मकता निर्माण झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  Maharashtra Kesari 2022: कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील ठरला यंदाचा महाराष्ट्र केसरी

  Gold Rate : सोन्याच्या दरात ‘इतक्या’ रुपयांची वाढ, वाचा ताजे दर

  उद्यापासून कोरोनाच्या Booster डोसला सुरुवात, केंद्रानं दिल्या ‘या’ महत्त्वाच्या सूचना

  “शरद पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्यामागे संजय राऊतांचा हात”

  आताची सर्वात मोठी बातमी! गुणरत्न सदावर्तेंना ‘इतक्या’ दिवसांची पोलीस कोठडी