मुंबई | कोरोना हळूहळू आटोक्यात येत असलेला पहायला मिळत आहे. त्यामुळे परिस्थीती पूर्वपदावर येत आहे. अशातच देशातील कोरोना रूग्णांबाबत सकारात्मकता निर्माण झाली आहे.
आटोक्यात आलेला कोरोना पाहता अजून जास्त दिवस निर्बंध राहणार नसल्याचं चित्र आहे. त्यामुळे नागरिकांनाही काहीश्या प्रमाणात दिलासा आहेच.
राज्यात सध्या 893 सक्रीय रुग्ण आहे. तर आज राज्यात 138 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. आजची सक्रीय रुग्णसंख्या रुग्णसंख्या एक हजारांखाली आली आहे.
राज्यात आतापर्यंत 77,24, 697 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्के झाले आहे.
गेल्या चोवीस तासात दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 137 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत कोरोना लसींचे सुमारे 170 कोटी डोस देण्यात आले आहेत. आतापर्यंत लसीचे 170 कोटी 87 लाख 6 हजार 705 डोस देण्यात आले आहेत.
सध्याची कोरोना स्थिती आटोक्यात येत असल्याचं चित्र पहायला मिळत आहे. देशातील कोराना रूग्णांबाबत सकारात्मकता निर्माण झाली आहे.
सर्व नागरिकांनी लसीकरण मोहिमेत सहभाग नोंदवत लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करून घ्यावं, असे आवाहन केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे करण्यात येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
अध्यात्माच्या मार्गावर चालण्यासाठी ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीनं चित्रपटसृष्टीला ठोकला रामराम
“ठाकरे साहेब, तुम्हाला जेलमध्ये टाकायला तुमची परवानगी घेणार नाही”
‘हिंमत असेल तर…’; अनिल परबांचं थेट आव्हान
‘अनिल परबांचं रिसाॅर्ट तोडून दाखवणार’; किरीट सोमय्या आक्रमक
Gold Rate: सोन्याच्या दरात काय बदल झाला, वाचा एका क्लिकवर