Corona Update: आज राज्यात ‘इतक्या’ नव्या रुग्णांची भर, वाचा आकडेवारी

मुंबई | कोरोना हळूहळू आटोक्यात येत असलेला पहायला मिळत आहे. त्यामुळे परिस्थीती पूर्वपदावर येत आहे. अशातच देशातील कोरोना रूग्णांबाबत सकारात्मकता निर्माण झाली आहे.

आटोक्यात आलेला कोरोना पाहता अजून जास्त दिवस निर्बंध राहणार नसल्याचं चित्र आहे. त्यामुळे नागरिकांनाही काहीश्या प्रमाणात दिलासा आहेच.

राज्यात रविवारी 140 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर 106 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर . राज्यात सध्या 926 सक्रीय रुग्ण आहेत.

राज्यात आजपर्यंत एकूण 77,24,803 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.11% एवढे झाले आहे.

देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत कोरोना लसींचे सुमारे 170 कोटी डोस देण्यात आले आहेत. आतापर्यंत लसीचे 170 कोटी 87 लाख 6 हजार 705 डोस देण्यात आले आहेत.

सध्याची कोरोना स्थिती आटोक्यात येत असल्याचं चित्र पहायला मिळत आहे. देशातील कोराना रूग्णांबाबत सकारात्मकता निर्माण झाली आहे.

सर्व नागरिकांनी लसीकरण मोहिमेत सहभाग नोंदवत लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करून घ्यावं, असे आवाहन केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे करण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  “शिवसेनेची केलेली चेष्टा किती महागात पडतीये हा अनुभव आपण घेताय”

  पुढील 3 दिवसांत ‘या’ जिल्ह्यांत उष्णतेची लाट, हवामान खात्याचा इशारा 

  “संजय राऊतांनी केलेली माझी चेष्टा अंगावर येणार आहे, आता खूप काहीतरी…”

  “राष्ट्रवादी नवऱ्याच्या भूूमिकेत तर शिवसेना ही मूक बायकोच्या भूमिकेत” 

  “काही नेते जात्यात, काही नेते सुपात, तर काहींचं पीठ झालंय”