फक्त कोरोनाच नाही तर ‘या’ आजारांवर देखील फायदेशीर कोरोना लस

नवी दिल्ली | कोरोना (Corona) महामारीशी लढण्यात सर्व जग गुंतलं आहे. सध्या कोरोनाच्या ओमिक्राॅन (Omicron) या नव्या व्हेरियंटनं सर्वांना चिंतेत टाकलं आहे. अशात आता कोरोना लसीकरणाबाबत (Vaccination) एक दिलासादायक माहिती समोर येत आहे.

सध्या जगभर कोरोनाच्या रूग्णसंख्येत अचानक वाढ होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत लसीकरणाचा वेग वाढवण्यावर सर्व सरकार आणि संस्था भर देताना दिसत आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी लसीकरणाबाबत एक महत्त्वाची माहिती काही दिवसांपूर्वीच सर्वांना सांगितली होती. त्यानंतर आता लसींचा फायदा लक्षात यायला लागला आहे.

कोरोनाच्या शेवटच्या 2 लाटांच्या तुलनेत सध्याच्या रुग्णांमध्ये काही सौम्य लक्षणं दिसून येत आहेत. या विषाणूची लागण झालेल्या बहुतेकांना घसा खवखवणे, कर्कश आवाज अशी आहेत.

कोरोना लसींचा परिणाम सध्या रूग्णांवर होताना दिसत आहे. कोरोनाच्या लसींच्या परिणामी कोरोनापासून तर बचाव होत आहे. याउलट इतर आजारांच्या रूग्णांना देखील याचा फायदा होताना दिसत आहे.

सर्दी, खोकला, ताप, घसा खवखवणे या आजारांवर देखील कोरोना लस प्रभावी ठरत असल्याचं डाॅक्टरांना संशोधनात लक्षात आलं आहे. परिणामी सध्या लसीकरणाचा वेग वाढवण्यात आला आहे.

कोरोनाची प्राथमिक लक्षणं ही ताप येणं, सर्दी, खोकला अशीच आहेत. परिणामी कोरोना लस ही अनेक इतर आजारांवर प्रभावी ठरत आहे. सध्या लस संशोधक आणखीन माहिती घेत आहेत.

दरम्यान, लस घेण्यानं शरीरात रोगप्रतिकारक शक्ती तयार होते. परिणामी याचा परिणाम हा इतर रोगांवर होतो. सध्या कोरोना लसींचा इतर फायदा लक्षात घेता सर्वजण लस घेण्याचा विचार करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

 “झोपेत देखील दिलेला शब्द पाळण्याची सवय मला आई-वडिलांनी लावली”

 IPL 2022 Mega Auction: ‘या’ 5 खेळाडूंवर लागू शकते सर्वाधिक बोली

किंग कोहलीचा उत्तराधिकारी कोण??? ‘या’ खेळाडूच्या नावाची होऊ शकते लवकरच घोषणा

‘माझ्या नादी लागाल तर करील 302’; पिंपरीतील तरुणीची सोशल मीडियावर भाईगिरी 

“गंगेत वाहून गेलेले मृतदेह योगींना मतं द्यायला येणार आहेत का?”