Corona Virus: ‘खोकला 2-3 आठवडे जात नसेल तर…’

नवी दिल्ली | कोरोना महासाथीच्या रोगामुळे आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला नागरिकांना सामोरं जावं लागत आहे. अशातच कोरोनाच्या नवनवीन व्हेरियंटमुळे नागरिकांची चिंता वाढवली आहे.

कोरोनाची तिसरी लाट आता आटोक्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांना थोडा दिलासा मिळाला आहे. कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात असलेला पहायला मिळत आहे.

कोरोनाचा नवीन व्हेरियंट ओमिक्राॅनमुळे मोठ्या प्रमाणात खोकला दिसून येतोय. अशातच कोणत्याही वायरल इन्फेक्शनमुळे तुम्हाला ब्रोंकायटिस होत असतो.

ओमियक्रॉनच्या रुग्णांमध्ये यातील फक्त खोकला हे एकच लक्षण प्रामुख्याने दिसतं. मात्र जर खोकला दोन-तीन आठवडे जात नसेल तर एक्स-रे करुन घ्यावा.

खोकला हा कोणत्याही वायरल इन्फेक्शन राहत असतो. जर खोकला सतत असेल तर छातीचा एक्स-रे करुन घ्यावा. जर कफ नसेल तर इतर गोष्टी करणं काही गरजेचं नाही, असं कोविड टास्क फोर्सचे सदस्या डॉक्टर बसंत नागवेकर यांनी सांगितलं.

ओमियक्रॉनमध्ये मोठ्या प्रमाणात खोकला दिसून येतोय. ब्रोंकायटिस झाला तर दोन-तीन महिने साधारण खोकला राहतो, अशात यावर उपचार सुरु करावेत.

कोरोना महासाथीच्या रोगानं जगभरात हाहाकार माजवला. या महासाथीच्या रोगाच्या तीन लाटा आल्याचं भयानक चित्र पहायला मिळालं. आता हळूहळू ही महामारी कमी होत असल्याचं पहायला मिळत आहे.

कोरोना संसर्गाची तिसरी लाट मार्चपर्यंत संपण्याची शक्यता, तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या एका अधिकाऱ्याच्या मते, देशातील काही भागांमध्ये या महिन्याच्या अखेरीस तिसरी लाट ओसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  “नाना तू उद्या सागरवर येऊन दाखव, पाहतो तू कसा परत जातो”

  Jayprabha Studio: “आमचं चुकलं असेल तर मी राजकीय संन्यास घेईन”

  येत्या 24 तासांत ‘या’ भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता

  “मी वाघाचा मुलगा आहे, नरेंद्र मोदींना सत्तेतून हाकलून देईन”

“चंद्रकांत पाटील मोठे व्यक्ती आहेत, त्यांच्याबद्दल माझ्यासारख्या कार्यकर्त्याने बोलणं योग्य नाही”