कोरोनासंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेचा नवा खुलासा; ‘या’ खुलाशानं एकच खळबळ

नवी दिल्ली |  कोरोनासारख्या महामारीचा दुसरा सर्वोच्च टप्पा येणं आणखी बाकी आहे, असा गंभीर इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. मायकल रियान यांनी हे वक्तव्य केलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या या इशाऱ्याने जगभरात खळबळ माजली आहे.

ज्या देशांनी कोरोनावर मात केली आहे तसंच लॉकडाऊन उठवला आहे किंवा शिथील केला आहे अशा देशांना जागतिक आरोग्य संघटनेने इशारा दिला आहे. एकप्रकारे नियोजन नसताना लॉकडाऊन उठवणं योग्य नसल्याचं जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे.

एप्रिल मे मध्ये कोरोनाचा पहिला पिक आल्यानंतर आणि जसजसा तो शांत होतोय, असं लक्षात आल्यानंतर बऱ्याचश्या देशांनी निर्बंध उठवायला सुरूवात केली. मात्र लॉकडाऊन उठवल्यानंतर कोरोना पॉझिटीव्ह केसेसमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली.

दरम्यान, जूनच्या शेवटाला कोरोना व्हायरसची दुसरी लाट येईल यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पॉझिटीव्ह केसेस सापडतील, असं भाकित जागतिक आरोग्य संघटनेने केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-“योगीजी, कामगार-मजूरांना ‘आई’ सांभाळत नाही म्हणून ‘मावशी’कडे येतात”

-फेसबुकवर संजय राऊतांची पोस्ट, सकाळी सकाळी केलेल्या पोस्टनं वातावरण तापलं

-राज्यपालांच्या भेटीनंतर पवार ‘मातोश्री’वर; उद्धव ठाकरे- संजय राऊतांशी गुप्त चर्चा

-बिपिन रावत दर महिन्याला पगारातून 50 हजार रुपये पीएम केअर फंडला देणार

-राज्यात आज 1196 रूग्ण ठणठणीत होऊन घरी, पाहा नव्याने किती रूग्णांची झालीये नोंद