तिसऱ्या लाटेवर इंदुरीकर महाराज म्हणतात, “दोन लाटा येऊन गेल्या ओ…”

मुंबई | आपल्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत येणारे प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj) लसीकरणावर केलेल्या वक्तव्यामुळे चांगलेच चर्चेत आले होते. “मी लस घेतली नाही आणि घेणारही नाही”, असं वक्तव्य त्यांनी कीर्तन केलं होतं.

इंदुरीकर महाराज यांच्या या वक्तव्यामुळे त्यांना टीकेला सामोरं जावं लागलं होतं. त्यावेळी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील यांना देखील यावर भाष्य करावं लागलं होतं.

इंदुरीकर महाराज त्यांच्या कीर्तनातून समाजप्रबोधन करण्याऐवजी चुकीचा रस्ता दाखवत असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यावेळी वैज्ञानिक दृष्टीकोनातून आपण स्वत: इंदुरीकर महाराजांची समजूत घालू, असं राजेश टोपे म्हणाले होते.

त्यानंतर आता इंदुरीकर महाराज यांनी तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मोठं वक्तव्य केलं आहे. कोरोना पॉझिटिव्ह असल्यासारखं वागू नये. दोन लाटांतही आपण जिवंत आहोत, हे आपलं भाग्य आहे, असं इंदुरीकर महाराज यांनी म्हटलं आहे.

हा आपला जन्म नसून पूनर्जन्म असल्याचं देखील इंदुरीकर महाराज यांनी म्हटलं आहे. मला कोरोना झाला नाही, कारण मी माळकरी आहे. आता, तिसरी लाट माळा काढणाऱ्यांसाठी, असं इंदुरीकर महाराज म्हणाले.

कीर्तनात उत्साहानं बसायला हवं. कोरोना पॉझिटिव्ह असल्यासारखं वागू नका. दोन लाटांतही आपण जिवंत आहोत, असंही इंदुरीकर म्हणाले. इंदुरीकर महाराजांच्या या वक्तव्यावर हास्यकल्लोळ उडाला होता.

दरम्यान, जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील वाकुळणी येथे इंदुरीकर महाराज यांचं कीर्तन आयोजित केलं होतं. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

महत्वाच्या बातम्या –

5 वर्षांची चिमुकली रिपोर्टर पाहिलीत का?; पाहा हफिजाची रिपोर्टिंग

 श्रेयवादाची लढाई सुरू! राज ठाकरेंचा ‘तो’ जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

छगन भुजबळांच्या अडचणीत वाढ; ‘या’ प्रकरणात अंजली दमानिया पुन्हा आक्रमक

भारतातील कोरोना स्थितीबाबत अमेरिकेतील तज्ज्ञांचं मोठं वक्तव्य, म्हणाले… 

‘… तर घरीच उपचार घ्या’; जाणून घ्या सरकारच्या या मार्गदर्शक सूचना