कोरोनाचा पुन्हा हाहाकार! ‘या’ देशात पाचव्या लाटेच्या उद्रेकाने भीतीचं वातावरण

मुंबई | गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण जग कोरोनाने त्रस्त आहे. लसीकरण हाच एक कोरोनावर प्रभावी औषध समजलं जातंय. अशातच अनेक देशांना कोरोनाच्या चौथ्या आणि पाचव्या लाटेचा सामना करावा लागला आहे.

जगातील अनेक देशांना कोरोनाच्या भयंकर परिस्थितीचा सामना करावा लागला आहे. भारतातही दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला होता. अनेकांना आपले जीव गमवावे लागले. देशात ऑक्सीजनची आणि बेडची मोठी कमतरता होती.

आता फ्रान्समध्ये कोरोनाचा धोका वाढला असून रूग्णांची संख्या वाढली आहे. रूग्णालयात दाखल होणाऱ्या रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे.

फ्रान्समध्ये कोरोनाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून पाचवी लाट आल्याचं मतं तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.

फ्रान्सचे आरोग्यमंत्री ओलिवियर वेरन यांनी माहिती दिली की, फ्रान्समध्ये कोरोनाच्या पाचव्या लाटेला सुरूवात झाली आहे. आपल्या शेजारील देशांमध्ये लाट आलेली आहे. त्यांचा जर डेटा पाहिला तर या अगोदरपेक्षा भयंकर परिस्थिती निर्माण होऊ शकते, असंही फ्रान्सच्या आरोग्य मंत्र्यांनी सांगितलं आहे.

याआधीच्या लाटेच्या तुलनेत ही लाट अत्यंत विनाशकारी असेल, असंही ओलिवियर वेरन यांनी म्हटलं आहेत. तसेच त्यांनी नागरिकांना  कोरोनाच्या नियमांच अत्यंत काटेकोरपणे पालन करा, असं आवाहन देखील केलं आहे.

जास्तीत जास्त लसीकरणाने आणि स्वच्छतेने आपण कोरोनाला हरवू शकतो, असं त्यांनी म्हटलं आहे. आतापर्यंत फ्रान्समध्ये 73.46 लाखांपेक्षा अधिक लोकांना कोरोनाची लागण झालेली आहे.

फेब्रुवारी महिन्यात कोरोनाचा उद्रेक पहायला मिळाला होता. त्यातच आता पुन्हा एकदा फ्रान्समध्ये कोरोनाने डोकं वर काढलं आहे. गेल्या आठवड्यात सातत्याने मोठी रूग्णवाढ होताना दिसत आहे.

दरम्यान, मोठ्या लसीकरणानंतरही देखील युरोप कोरोना महामारीचं केंद्र बनला आहे. कोरोना साथीच्या संकटापासून वाचण्यासाठी योग्य ती खबरदारी घेणं गरजेचं आहे. जगातील 53 देशांमध्ये कोरोनाच्या नव्या लाटेचा धोका निर्माण झालेला आहे, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.

कोरोना रूग्णांची संख्या पुन्हा मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. कोरोना प्रसाराचा वेग ही गंभीर बाब आहे, असं जागतिक आरोग्य संघटेने प्रादेशिक प्रमुख हॅन्स क्लुज यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-
“कंगनाचा वरचा मजला रिकामा, तिचा पद्मश्री पुरस्कार काढून घ्यावा”

“संजय राऊत बोलून बोलून दमतात, त्यांना बॉर्नविटा पिण्याची गरज”

“एसटी कर्मचाऱ्यांना कामावर जायचंय, पण भाजप कार्यकर्ते जाऊ देत नाहीत”

हिंदुत्वाची तुलना आयसिस आणि बोको हरामशी; सलमान खुर्शिदांच्या पुस्तकावरून नवा वाद

“देशाला 1947 मध्ये भीक मिळाली, खरं स्वातंत्र्य तर 2014 मध्ये मिळालं”