मुंबई | यंदाच्या आयपीएल हंगामावर कोरोनाचं सावट आहे. कोरोनाचे मुंबई पुण्यासह नागपुरात देखील रूग्ण सापडले आहेत. त्यामुळे राज्य सरकारने सावध पावलं उचलली आहेत. शासनाने आयपीएलसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे.
आयपीएल सामने पाहायला गर्दी होऊ नये म्हणून तिकीट विक्री होणार नाही, असा निर्णय शासनाने आजच्या कॅबीनेट बैठकीत घेतला आहे. त्यामुळे साहजिकच प्रेक्षकांविना सामने पार पडणार असल्याचं सध्या तरी चित्र आहेत.
राज्य शासनाच्या निर्णयाने क्रिकेटप्रेमींचा मात्र हिरमूड होणार आहे. त्यांना यंदाच्या हंगामातील सामने पाहता येणार नाहीत. घरी बसूनच त्यांना सामन्यांचा आनंद घ्यावा लागेल.
दरम्यान, प्रेक्षकांविना सामने खेळवले जातील, अशी चर्चा सध्या बीसीसीआयमध्ये सुरू असल्याची माहिती आहे. परंतू तसा प्रस्ताव आमच्यापर्यंत आला नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. तर प्रेक्षकांच्या उपस्थितीतच सामने व्हावे, असा आग्रह जर बीसीसीआय धरत असेल तर यंदाचा हंगाम काही दिवसांपासाठी पुढे ढकलण्यात यावा, असं शासन बीसीसीआयला सांगेल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या –
-सावधान पुणेकरांनो…आणखी एक कोरोनाचा रूग्ण सापडला
–फडणवीस की पवार, चांगला सहवास कुणाचा??; काकडे म्हणतात…
-‘शिवाजी’ ही तीन अक्षरे म्हणजेच उर्जेचा स्त्रोत; राज ठाकरेंचं शिवजयंतीनिमित्त खास ट्वीट
-दिल्ली हिंसाचारात हिंदू , मुस्लीमाचं नाहीतर माणुसकीचं रक्त वाहिलं- डॉ.अमोल कोल्हे
-शरद पवारांची संपत्ती किती? प्रतिज्ञापत्रकातून समोर आली माहीती