स्वप्नांना लागली कोरोनाची नजर! पुण्यात ‘एमपीएससी’ करणाऱ्या मुलाचा कोरोनामुळे मृत्यू

पुणे| देशात नव्याने आलेल्या कोरोना लाटेने पुन्हा कहर केला असून आता रोज नव्याने आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या लाखाच्या घरात गेली आहे. पहिल्या लाटेपेक्षाही गंभीर स्थिती यावेळी उद्‌भवल्याचे चित्र आहे. या दिवसेंदिवस भयावह होत चाललेल्या कोरोनामुळे अनेकांना जीव गमवावा लागला. अशीच आणखी एक घटना पुण्यातून आली आहे. एमपीएससीची तयारी करणाऱ्या एका तरुणानं कोरोनामुळं जीव गमावल्याची ही घटना आहे.

6 वर्षांपासुन तयारी करणारा पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या वैभव शितोळे या तरुणाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पोलीस अधिकारी होण्यासाठी मागील 6 वर्षांपासून वैभव प्रयत्न करत होता. मात्र कोरोनाचा संसर्ग झाल्याने उपचारादरम्यान त्याचं निधन झालं.

मुळचा श्रींगोद्या तालुक्यातील वैभव शितोळे असे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एमपीएससीच्या विद्यार्थ्याचे नाव आहे. इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याने स्पर्धा परीक्षा देण्याचे ठरवले. स्पर्धा परीक्षा हे एकमेव उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवत त्यात वैभवने स्वतःला पूर्णपणे झोकून तयारी सुरू ठेवली होती. मागील पाच ते सहा वर्षांहून अधिक काळ त्याची परीक्षांची तयारी करत होता.

आतापर्यंत विविध परीक्षेत यश मिळवले होते. तसेच मुलाखती पर्यंतचा टप्पा देखील गाठला होता. त्याच आत्मविश्वासाच्या जोरावर भविष्यात उत्तम यश पदरात पडू शकते हाच दृष्टिकोन बाळगून तो एमपीएससीच्या तयारी करत होता.पण त्याआधीच कोरोनाच्या विळख्यात सापडल्याने त्याला आपला जीव गमवावा लागला. त्याने उराशी बाळगलेलं अधिकारी होण्याचं स्वप्नं तसेच अर्धवट राहिलं.

पोलीस अधिकारी होण्याचं वैभवचं स्वप्न अपूर्ण राहिल्याची हळहळ त्याचा चुलत भाऊ अविनाश शितोळे यांनी ‘लोकसत्ता डॉटकॉम’शी बोलताना व्यक्त केली. वैभवच्या जाण्याने त्यासोबत स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या त्याच्या काही मित्रांनाही हळहळ व्यक्त केली आहे. चुलत भाऊ अविनाश शितोळे यांनी वैभवच्या खडतर प्रवासासंदर्भात ‘लोकसत्ता डॉटकॉम’शी बातचीत केली.

नाशिक येथील श्रीगोंदा तालुक्यातील भांडगाव येथील एका शेतकरी कुटुंबात वैभवचा जन्म झाला. आई, वडील, तो आणि एक बहीण असं त्याचं चौकोनी कुटुंब होतं. आजवर शितोळे कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवर चालत आला आहे. वैभवचं बारावीपर्यंतचं शिक्षण गावामध्येच पूर्ण झालं. नंतर तो इंजिनियरिंगचं शिक्षण घेण्यासाठी नाशिक शहरामध्ये गेला. पण लहानपणापासून वैभवला पोलीस अधिकारी व्हायचं होतं. ते त्याचं स्वप्न होतं, असं त्यांनी सांगितलं.

वैभवच्या मृत्यूनंतर त्याच्या काही मित्रांनी माध्यमांना सांगितले की, पुण्यात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. कोरोनामुळं स्पर्धा परीक्षांबाबतही अनिश्चितता असल्याने विद्यार्थ्यांवर मोठा तणाव आहे. त्यात कोरोनाच्या संसर्गामुळं अनेक विद्यार्थ्यांना लागण झाली आहे. तणावामुळं त्यांची तब्येत अधिक खालावते असंही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे.

दरम्यान, मागील महिन्यात स्पर्धा परीक्षेला स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यावेळी वैभव देखील शास्त्री रोडवरील आंदोलनात सहभागी झाला होता. विद्यार्थ्याचे प्रश्न सोडविण्यासाठी कायम तो पुढे असायचा हे सांगत असताना अविनाश शितोळे यांना अश्रू अनावर झाले.

महत्वाच्या बातम्या – 

प्रेक्षकांना पोटभोर हसवणाऱ्या कपिल शर्मानं केलं आपल्या…

अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यावर अभिनेत्री कंगना राणौतचा…

‘त्याचा हात माझ्या पँटमध्ये होता’,…

चक्क तरूणाने केलं आपल्या मावशीसोबत लग्न, वाचा काय आहे प्रकरण

अभिनेत्री दिव्या भारतीच्या मृत्यूनंतर सेटवर घडायच्या…