“देशातील कोरोनाची परिस्थीती अगदी ब्रिटनसारखी झाली आहे”

नवी दिल्ली | गेल्या काही महिन्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याचं पाहायला मिळालं होतं. परंतू फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाने पुन्हा डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसतं आहे.

यासाठी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने नागरिकांसाठी काही निर्बंधही घालून दिले आहेत. त्यामध्ये मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे यांसारख्या नियांमाचा समावेश आहे. पंरतू तरीही कोरोना आटोक्यात येत नाहीय.

देशात दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. देशातील कोरना रूग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होण्यामागचं कारण म्हणजे नवा स्ट्रेन असल्याची माहिती एम्सचे संचालक रणदीप गुलेरीया यांनी दिली आहे.

ख्रिसमच्या दरम्यान ब्रिटनही कोरोना विषाणूच्या म्युटेशनच्या प्रभावातून जात होता. तसेच भारत देशात होळीनंतर कोरोना रूग्णांच्या संख्येत चांगलीच वाढ होताना दिसली. कारण ब्रिटनसारखीच परिस्थीती पुन्हा पाहायला मिळत आहे, असं रणदीय गुलेरीया म्हणाले आहेत.

असंही होऊ शकतं की असं कोणतं म्युटेशन असेल जे विषाणूपेक्षा अधिक संसर्ग पसरवणारा असू शकतो. डेटा नाही याचा अर्थ असा नाही की याचे पुरावेच नाही. कोरोनाबाधितांची संख्या म्युटेशन संबंधीत असल्याच गुलेरीया म्हणाले आहे. रणदीप गुलेरीया यांनी एनडीटीव्हीशी संवाद साधला.

त्याचप्रमाणे कोरोनाबाधितांच्या संख्येत अचानकपणे वाढ होण्यामागे नक्कीच काहीनाकाही आहे. जे त्या विषाणूला अधिक जास्त प्रमाणात संसर्ग बनवित आहे, असंही रणदीप गुलेरीया यांनी नमूद केलं.

दरम्यान, रणदीप गुलेरीया यांना लसीकरणाबाबत विचारण्यात आलं. त्यावेळी त्यांनी लसीकरणासंबंधी एक रणनिती तयार करणे गरजेची आहे. ज्याच्या माध्यमातून जास्त लोकांपर्यंत पोहोचू आणि त्या लोकांचं लसीकरण करू शकू.

तसेच लहान मुलांना देता येतील अशा लसींच उत्पादन करण्याचा विचार सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडीया आणि भारट बायोटेक करत आहेत. जर आपल्याला या महासाथीला हारवायचं असेल, तर अशा लसींची आपल्याला गरज आहे. ज्या लहान मुलांना देता येतील. जेणेकरून आपल्याला त्यांना शाळेत पाठवता येईल, असं गुलेरीया यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या- 

‘या’ व्यक्तीच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी…

पुणेकरांना दिलासा देणारी बातमी! कोरोनाच्या पार्श्वभूमीवर…

नाशिक शहरात परिस्थिती गंभीर! कोरोना रुग्णांना बेड न…

…अन् जंगलाचा राजा पाण्यातील बदकासोबत खेळू लागला; पाहा…

वाह! क्या बात है’; या मुंगुसाचा अभिनय पाहून…