नवी दिल्ली | ओमिक्रॉन विषाणूच्या (Omicron variant) पार्श्वभूमीवर देशात खबरदारी घेतली जात आहे. अनेक राज्यांमध्ये निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यातच आता खबरदारी म्हणून पश्चिम बंगालकडून निर्बंध लावण्यात आले आहेत.
पश्चिम बंगालमध्ये 4 हजार 515 नवीन कोरोना रूग्ण आढळल्याने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कठोर पाऊल उचललं आहे. पश्चिम बंगाल राज्याचे मुख्य सचिव एच. के. द्विवेदी (H. K. Dwivedi) यांनी पत्रकार परिषद घेत नवीन निर्बंधांसंदर्भात माहिती दिली आहे.
राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालय बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच पश्चिम बंगालच्या सरकारकडून दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेशच्या प्रमाणे नाईट कर्फ्यू लावण्याचाही निर्णय घेतला आहे.
सरकारी कार्यालयातील उपस्थिती 50 टक्क्यांवर आणण्यात आली आहे. तसेच विद्यापीठे, स्पा सेंटर, ब्युटी पार्लर, प्राणी संग्रहालय, मनोरंजन पार्क, स्वीमिंग पुल, जीम आणि पर्यटन स्थळे पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.
सर्व प्रशासकीय बैठका या व्हर्चुयल माध्यमातूनच होतील, असंही सांगण्यात आलं आहे. तसेच शॉपिंग मॉल्स, दुकाने, रेस्टॉरंट्स येथे एकूण क्षमतेच्या 50 टक्के ग्राहकांची मर्यादा असणार आहे. त्याचप्रमाणे सिनेमागृहांसाठी देखील 50 टक्क्यांची मर्यादा असणार आहे.
लग्न समारंभ, अंत्यविधी, सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम याकरिता 50 जणांच्या उपस्थितीची मर्यादा घालण्यात आली आहे. पश्चिम बंगाल येथील कोलकाता महापालिका क्षेत्रात 2 हजार 398 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. राज्यातील रूग्णसंख्या वाढीमुळे कडक निर्बंध लावण्यात आले आहेत.
महाराष्ट्रात देखील 31 डिसेंबरला राज्य सराकारकडून नवीन निर्बंध जारी करण्यात आले होते. सांस्कृतिक, धार्मिक आणि राजकीय कार्यक्रमांकरिता 50 लोकांची मर्यादा घालण्यात आली आहे.
तसेच पर्यटन स्थळांवर जमावबंदी लागू करण्यात आली आहे आणि स्थानिक प्रशासानाला कडक निर्बंध लावण्याची मुभा देण्यात आली आहे. शनिवारी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (State Health Minister Rajesh Tope) यांनी महाराष्ट्रात लॉकडाऊनचा विषय नसल्याचं म्हटलं आहे.
लॉकडाऊनची भाषा आम्ही त्यावेळेसचं करू जेव्हा 700 मेट्रीक टनची आवश्यकता भासेल. राजेश टोपे यांनी लॉकडाऊनबाबत बोलताना लॉकडाऊनचा परिणाम थेट अर्थकारणावर होतो.
गरीब माणूस हा हातावर पोट भरत असतो. लोकांनी पहिल्या आणि दुसऱ्या लॉकडाऊनचे चटके सोसले आहेत. सद्यस्थितीत कोरोना रूग्णांचे आकडे डबल होत असल्याची वस्तुस्थिती आता आकड्यांवरून दिसत आहे.
जे निर्बंध घातले आहेत त्याची कठोर अंमलबजावणी करणं हे शासनासमोर मोठ आव्हानात्मक असल्याचही राजेश टोपे यांनी म्हटलं होतं. तसचे राज्य सरकारकडून नागरिकांना गर्दी न करण्याचं आवाहन करण्यातं आलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
तज्ज्ञ म्हणतात, ‘ओमिक्राॅनमुळे फायदाच होणार’; कसं ते वाचा सविस्तर
रवी गोडसे म्हणतात, “ओमिक्राॅन ही वाईट बातमी पण…”
Sulli डील, Bulli डील- नेमका हा प्रकार आहे तरी काय?
पिकअपचा चक्काचूर!, असा अपघात की हलक्या काळजाच्या लोकांनी वाचू नये
‘नारायण राणेंनी इतरांची उणीदुणी काढण्यापेक्षा…’; अजित पवारांनी राणेंना दिला सल्ला