“गुजरातमधून कोरोना हद्दपार करायचा असेल, तर मुख्यमंत्र्यांना हटवा”

नवी दिल्ली | महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. असं असताना आता भाजपच्याच खासदाराने गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना पदावरुन हटवण्याची मागणी केली आहे. भाजपचे राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी गुजरातमधून कोरोना हद्दपार करायचा असेल, तर मुख्यमंत्र्यांना हटवा अशी मागणी केली आहे.

राज्यातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आनंदीबेन पटेल यांना मुख्यमंत्री पदी नियुक्त करावं, अशी मागणी स्वामी यांनी ट्विटवरुन केली आहे. गुजरातमध्ये कोरोनामुळे दगावणाऱ्या रुग्णांची संख्या कमी करायची असल्यास आनंदीबेन पटेल यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवावं, असं स्वामी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

गुजरातमधील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसोंदिवस वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री विजय रुपानी यांना मुख्यमंत्रीपदावरुन हटवून त्यांच्या जागी केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांच्या हाती राज्याचे नेतृत्व दिलं जाण्यासंदर्भातील चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरु आहेत.  मात्र मांडविया यांनी स्वत:च ट्विट करुन या चर्चांना पूर्णविराम दिला.

संपूर्ण जग कोरोनाशी लढा देत आहे. गुजरातमध्येही तीच परिस्थिती आहे. राज्याचे मुख्यमंत्री रुपानी हे चांगल्याप्रकारे नेतृत्व करत आहेत. अशावेळी मुख्यमंत्री बदलण्यासंदर्भात अफवा पसरवणं जनतेच्या हिताच्या दृष्टीने योग्य नाही, असं मांडविया यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-नागरिकांनो घाबरू नका; भारत कुठल्याही परिस्थितीला तोंड देण्यास तयार-डॉ. हर्षवर्धन

-विधानपरिषद उमेदवारीबाबत शशिकांत शिंदे यांचा मोठा खुलासा

-“ज्या मुंबईने आम्हाला पोसलंय, तिला संकटकाळात सोडून जाणार नाही”

-चीनकडे कोरोनाचा फैलाव रोखण्याची क्षमताच नव्हती- डोनाल्ड ट्रम्प

-कोणत्याही लसीशिवाय कोरोना निघून जाणार; डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य