“…तर भारतातील कोरोना रुग्णांची संख्या 36 ते 70 लाखांवर गेली असती”

नवी दिल्ली | लॉकडाउन जाहीर केल्यामुळे देशातील जवळपास 1. 2 लाख ते 2.1 लाख लोकांचा जीव वाचला असल्याचं केंद्र सरकारने सांगितलं आहे. बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपच्या मॉडेलनुसार लॉकडाउन जाहीर केला नसता तर देशातील कोरोना रुग्णांची संख्या 36 ते 70 लाखांवर गेली असती, अशी माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे.

सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाचे सचिव प्रवीण श्रीवास्तव यांनी आकडेवारीतून लॉकडाउन किती प्रभावी ठरला हे दिसत असल्याचं म्हटलं आहे.

आम्ही जे मॉडेल आत्मसात केलं आहे त्यानुसार लॉकडाउन जाहीर करण्या आल्याने 14 ते 29 लाख लोकांना कोरोनापासून दूर ठेवण्यात यश मिळवलं असून 37 ते 78 हजार लोकांचा जीव वाचला आहे, अशी माहिती प्रवीण श्रीवास्तव यांनी दिली आहे.

लॉकडाउनमुळे आपण तीन गोष्टी मिळवल्या आहेत. मृतांची संख्या, करोना रुग्णांची संख्या तर कोरोनाचा प्रसार करणाऱ्यांची संख्या रोखण्यात लॉकडाउनमुळे यश मिळालं आहे, असं एम्पावर्ड ग्रुपचे चेअरमन व्ही के पॉल यांनी सांगितलं आहे.

 

 

 

महत्वाच्या बातम्या-

-निधीची गरज लागल्यास मागणी करा, तात्काळ देतो; अजितदादांचा पुणे महापौरांना शब्द

-अम्फान वादळाचा फटका, पंतप्रधानांकडून पश्चिम बंगालसाठी ‘इतक्या’ कोटींची मदत जाहीर

-खासगी रुग्णालयात होणारी रुग्णांची लूटमार थांबवण्यासाठी ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

-“घराचं रणांगण फक्त कौरवांनी केलं होतं आणि आज भाजपने”

-मुंबईत ‘या’ रेल्वे स्थानकांवर आरक्षित गाड्यांसाठी तिकीट काऊंटर सुरु