कौतुकास्पद! शवविच्छेदन करणाऱ्या कर्मचाऱ्याने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिला महिन्याभराचा पगार

बुलढाणा | कोरोनामुळे अनेक आर्थिक व्यवहार आणि उद्योग धंदे बंद असल्याने देशाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. अशाच कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी जनतेने आर्थिक मदत करावी असं आवाहन सरकारी यंत्रणांच्या मार्फत केलं जात आहे.  या आवहानाला जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

वेगवेगळ्या स्तरातील लोकांनी पुढे येऊन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पैसे दिले आहेत. तसेच सामाजिक भान जपत शवविच्छेदनाचं काम करणाऱ्या एका व्यक्तीने आपला एका महिन्याचा पगार महाराष्ट्र मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिला आहे. यासंदर्भात बुलढाणा जिल्हा माहिती केंद्राने माहिती दिली आहे.

बुलढाणा जिल्हा सामान्य रूग्णालयात सफाईगार पदावर शवविच्छेदनाचं काम करणारे मोहम्मद अफसर शेख गफ्फार यांनी कोरोना आजारावरील नियंत्रणाच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला एक महिन्याचं 23 हजार रूपये वेतन आज बँक खात्यात जमा केलं आहे, असं ट्विट बुलढाण्यातील माहिती केंद्राने केलं आहे.

दरम्यान, एप्रिल महिन्यामध्ये अशाच प्रकारे तेलंगणामधील एका सफाई कर्मचाऱ्याने त्याचा दोन महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिला होता.

 

महत्वाच्या बातम्या-

-केंद्र सरकार रेल्वे देण्यास तयार, कामगारांना पायी जाण्यापासून रोखा- देवेंद्र फडणवीस

-लॉकडाऊनमुळे राज्यभरात अडकलेल्या नागरिकांना ST मोफत गावी पोहोचवणार; ‘या’ अटींसह प्रवास शक्य

-80 वर्षीय वडिलांना खांद्यावर घेऊन मजुराचा मुलुंड ते वाशिम 350 किमी पायी प्रवास

-काही लोकांनी माझ्या मृत्यूसाठी प्रार्थना केली पण…- अमित शहा

-“गुजरातमधून कोरोना हद्दपार करायचा असेल, तर मुख्यमंत्र्यांना हटवा”