कोरोनाविरोधी लढ्यासाठी मोदी सरकारचा नवा प्लॅन!

नवी दिल्ली | कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी सरकारने आता नवा अ‍ॅक्शन प्लॅन तयार केला आहे. पाच टप्प्यांमध्ये या प्लॅनची अंमलबजावणी केली जाणार आहे.

वेगवेगळ्या भागांसाठी वेगवेगळे उपाय करण्याची सरकारची रणनीती आहे. जिथे कोरोनाचा सर्वाधिक फैलाव झाला आहे अशा हॉट स्पॉटच्या ठिकाणी कठोर प्रतिबंधात्मक उपाय केले जाण्याची शक्यता आहे. पाच प्रकारच्या परिस्थितीनुसार काम करण्यात येणार आहे.

भारतात प्रवासामुळे उद्भवलेल्या कोरोना, स्थानिक पातळीवर किंवा कोणत्याही प्रवासाची हिस्ट्री नसताना झालेली लागण, मोठ्या प्रमाणात झालेली लागण पण त्यावर सहज मात करता येऊ शकेल अशी स्थिती, कोरोनाची समूह स्तरावर होऊ लागलेली लागण आणि त्यानंतर कोरोना महामाराची स्थिती अशा टप्प्यावर उपाययोजना करण्यात येणार आहेत.

देशातील लोकसंख्या बघता कोरोना व्हायरस मोठ्या प्रमाणात पसरेल अशी भीती व्यक्त केली जात आहे. पण, देशात सर्वच ठिकाणी हा व्हायरस पसरेल असंही नाही. त्यामुळे या व्हायरसच्या फैलावर उपाय करण्यासाठी सरकार आता नवीन मार्ग अवलंबत आहे.

महत्वाच्या बातम्या-

-दर्यादिल दादा… लॉकडाऊन काळात 10 हजार लोकांच्या जेवणाची जबाबदारी उचलली

-विराट कोहली अन् रो’हिट’ शर्माचा पंतप्रधान मोदींना पाठिंबा; केलं हे आवाहन

-पुण्यात 24 तासात कोरोनाचा तीसरा बळी; मृतांची संख्या पाचवर

-‘कोरोना’काळातही काका-पुतण्यांमध्ये जुंपली; होम क्वारंटाइन करण्याच्या मागणीवर जयदत्त क्षीरसागर म्हणाले…

-मोदींनी केलेल्या आवाहनानुसार आज सर्वांनी वीज घालवली तर अडचण येईल का?; फडणवीस म्हणाले…