यवतमाळ | कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या पुण्यातील दाम्पत्यासोबत यवतमाळ जिल्ह्यातील 11 जणांनी प्रवास केल्याचं उघडकीस आलं. त्या प्रवाशांबाबतीत प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.
सर्व 11 जणांना घरातून बाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या असून आज दुपारी त्यांची आरोग्य तपासणी होणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील 3 कुटुंबातील 11 जण 24 फेब्रुवारीला दुबईला गेले होते.
यवतमाळ जिल्ह्यातील हे प्रवासी दुबईहून परतल्यापासून गेल्या काही दिवसांत अनेक ठिकाणी वावरले आहेत. त्यामुळं चिंतेत भर पडली आहे. आम्हाला कसलाही त्रास नाही. कालपर्यंत आमच्याशी कोणी संपर्क साधला नाही. कालपासून अचानक अनेकांचे फोन येत आहेत, असं संशयिताचं म्हणणं आहे.
दरम्यान, पुण्यात 5 कोरोनाग्रस्त सापडल्याने पुण्यात आणि राज्यात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नागरिकांना घाबरु नका काळजी घ्या, असं आवाहन केलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
ृ#Corona | स्वत:च डोकं वापरुन औषध घेऊ नका; अजित पवारांचं आवाहन
-#Corona I परदेशातून आलेल्या कुटुंबाला स्वत:च्याच घरात जाण्यापासून रोखलं अन् पुढे…
-कोरोना गो नाही तर कोरोना या असं म्हणू का?; आठवले टीकाकरांवर संतापले
-शॅडोवाल्यांचं मुख्यमंत्रिपद रिकामंच; ‘सामना’तून मनसेवर बोचरी टीका
-कोरोनाची पालकांनी घेतली धास्ती; शाळांबाबत जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा खुलासा