भाजप आमदाराच्या वाढदिवसाला सोशल डिस्टन्सिंगचं उल्लंघन

मुंबई | वर्धा जिल्ह्यातील आर्वीचे भाजप आमदार दादाराव केचे यांनी आज आपल्या वाढदिवशी धान्यवाटप जाहीर केल्याने उसळलेल्या गर्दीमुळे संताप व्यक्त होत आहे. राज्यात सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंग पाळण्याचं आवाहन करण्यात येत असताना हा प्रकार समोर आला आहे.

वाढदिवसानिमित्तानं गोरगरिबांना धान्यवाटप करण्याचं आमदार केचे यांनी जाहीर केलं होतं. त्यासाठी शनिवारी वार्डावार्डात सायकल रिक्षाद्वारे दवंडी पिटण्यात आली होती. केचे यांच्या बंगल्यापुढे रांगा लागणं सुरू झालं. मात्र गोरगरीबांची गर्दी वाढतच चालल्याने शेवटी एका सूज्ञ व्यक्तीने पोलिसांना माहिती दिली

पोलिसांनी लगेच घटनास्थळी पोहोचून गर्दी पांगविली. धान्यवाटप बंद करण्यात आले. केचेंच्या घराला लॉकडाऊन करण्यात आलं. काही पोलीस कर्मचारी केचेंच्या घराजवळ तैनात करण्यात आले आहेत.

दरम्यान, ही घटना जमावबंदी आदेशाचे सर्रास उल्लंघन असल्याची सार्वत्रिक प्रतिक्रिया उमटत आहे.

महत्वाच्या बातम्या-

-काँग्रेस नेते नसीम खान यांचं तबलिगींबाबत मोठं वक्तव्य!

-रामदास आठवलेंचं राज ठाकरेंवर टीकास्त्र; म्हणाले…

-‘माझ्या या प्रश्नांची उत्तर द्या’; दिवे पेटवण्यावरून कुमारस्वामींनी दिलं मोदींना आव्हान

-कोरोनाचा असाही परिणाम; गंगामाई घेऊ लागली आहे मोकळा श्वास!

-कोरोनाविरोधी लढ्यासाठी मोदी सरकारचा नवा प्लॅन!