मुंबई | दक्षिण आफ्रिकेतील कोरोनाच्या नव्या व्हेरियंटनं आता जगभर चिंता वाढली आहे. अशात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कर्नाटकमधील एकाच कॉलेजमधील अनेकांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.
कर्नाटकमधील धारववाढच्या कॉलेजमधील 281 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे सगळीकडे भितीचं वातावरण पसरलं आहे.
कोरोना झालेल्यांमध्ये विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी यांचा समावेश आहे. शुक्रवारी एका दिवसात 99 कोरोना रूग्ण आढळले आहेत. या प्रकारामुळे आरोग्य विभाग खडबडून जागं झालं आहे.
काही दिवसाआधीच कॉलेजमध्ये एक सांस्कृतिक कार्यक्रम झाल्याची माहिती समोर आल्याचं कर्नाटकच्या आरोग्यमंत्र्यांकडून सांगण्यात आलंय.
स्थानिक प्रशासनानं ताडतडीनं अजूनबाजूचा परिसर सॅनिटायझेशन करून घेतला आहे. तसेच अजूबाजूच्या शाळा आणि महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रशासन आता खडबडून कामाला लागलं आहे.
स्थानिक आरोग्य विभागापासून ते कर्नाटकचे आरोग्यमंत्री, मुख्यमंत्रीही याप्रकरणी लक्ष देत आहेत. पण या रुग्णवाढीमुळे राज्यात कोणतीही निर्बंध लावणार नसल्याचं कर्नाटक सरकारकडून सांगण्यात आलंय. याबाबत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलवत परिस्थितीचा आढावा घेतला आहे.
केरळमध्ये पुन्हा मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे कर्नाटकमधील रुग्णवाढ भविष्यात महाराष्ट्राची डोकेदुखी वाढवणार का? हेही पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे राज्यात खळबळ माजली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनं मोठा निर्णय घेतला आहे. दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाईन करण्याचा विचार महापालिका करत आहे, अशी माहिती समोर आलीये.
परदेशामधून येणाऱ्या प्रवशांच्या जिनोम सिक्वेन्सिंग टेस्ट करण्यावर पालिका भर देणार आहे. आगामी नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर परदेशातून अनेक नागरिक भारतात येण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची राज्यात दहशत; मुंबई महापालिकेनं घेतला मोठा निर्णय
कोरोनानं मृत्यू झालेल्या कुटुंबियांसाठी राजेश टोपेंनी केली मोठी घोषणा!
राकेश झुनझुनवालांना मोठा धक्का; एका आठवड्यात झालं तब्बल ‘इतक्या’ कोटींचं नुकसान
“अजूनही भाजप आणि शिवसेनेचं सरकार स्थापन होऊ शकतं”
भाजपला मोठं खिंडार पडणार?; राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या नेत्याचं मोठं वक्तव्य