देश

‘माझ्या या प्रश्नांची उत्तर द्या’; दिवे पेटवण्यावरून कुमारस्वामींनी दिलं मोदींना आव्हान

नवी दिल्ली | देशात लॉकडाउन लागू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना आज रात्री नऊ वाजता घरातील विजेवर चालणार प्रकाशदिवे बंद करून मेणबत्ती दिवे, मोबाईलची टॉर्च किंवा फ्लॅश लावण्याचं आव्हान केलं आहे. मोदी यांच्या या आवाहनावरून विरोधकांनी टीका केली.

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना तीन प्रश्न विचारले असून, त्याचं उत्तर देण्याचं आव्हान दिलं आहे. कुमारस्वामी यांनी ट्विट करून काही प्रश्नही मोदींना विचारले आहेत.

पंतप्रधानांनी धूर्तपणे देशाला भाजपच्या स्थापना दिनाच्या पूर्वसंध्येला मेणबत्ती पेटवण्याचं आवाहन केलं आहे का? 6 एप्रिल भाजपाचा स्थापना दिन आहे, त्यामुळे या कार्यक्रमासाठी तारीख आणि वेळ का निवडली हे सांगू शकतील का? मी पंतप्रधानांना आव्हान देतो, दिवा व मेणबत्ती लावण्यामागे एक वैज्ञानिक अथवा तर्कावर आधारित कारण त्यांनी सांगावं, असं कुमारस्वामी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, कोरोनाला रोखण्यासाठी सरकारनं कोणती पावलं उचलली आहेत. हे सांगण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आधीच त्रासून गेलेल्या जनतेला अर्थहीन काम करायला सांगत आहेत, अशी टीका कुमारस्वामी यांनी केली आहे.

 

 

महत्वाच्या बातम्या-

-कोरोनाचा असाही परिणाम; गंगामाई घेऊ लागली आहे मोकळा श्वास!

-कोरोनाविरोधी लढ्यासाठी मोदी सरकारचा नवा प्लॅन!

-दर्यादिल दादा… लॉकडाऊन काळात 10 हजार लोकांच्या जेवणाची जबाबदारी उचलली

-विराट कोहली अन् रो’हिट’ शर्माचा पंतप्रधान मोदींना पाठिंबा; केलं हे आवाहन

-पुण्यात 24 तासात कोरोनाचा तीसरा बळी; मृतांची संख्या पाचवर