मुंबई | जळगाव येथे रुग्णालयातून बेपत्ता झालेल्या 82 वर्षीय करोनाबाधित वृद्धेचा मृतदेह सहा दिवसांनी रुग्णालयाच्या शौचालयात आढळून आला. या घटनेवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हळहळ व्यक्त केली आहे. चंद्रकांत पाटील यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
सध्याच्या काळात माध्यमांमध्ये रोज कोरोनासंबंधी बातम्या येत आहेत. काही सकारात्मक तर काही नकारात्मक. पण काल एक बातमी माझ्या वाचनात आली आणि मन सुन्न झालं, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
राजकारणाच्या पलीकडे जाऊन एक माणूस म्हणून विचार केला तर या गोष्टीबद्दल प्रचंड दु:ख आणि संताप वाटतो, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, ज्या सरकारचा ढिसाळ कारभार चालू असताना आपण कसं शांत बसून राहणार? आवाज उठवायलाच हवा, असं सवाल चंद्रकांत पाटलांनी केलाय.
सध्याच्या काळात माध्यमांमध्ये रोज कोरोनासंबंधी बातम्या येत आहेत. काही सकारात्मक तर काही नकारात्मक. पण काल एक बातमी माझ्या वाचनात आली आणि मन सुन्न झालं. pic.twitter.com/Vhxok9vI2T
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) June 12, 2020
महत्वाच्या बातम्या-
-लॉकडाऊन पुन्हा जाहीर केलेला नाही, गर्दी करु नका स्वतःची काळजी घ्या- उद्धव ठाकरे
-“कोरोनाशी लढा देण्यासाठी देशात आणखी काही काळ लॉकडाऊन सुरू ठेवावा”
-आरक्षण हा मुलभूत अधिकार नाही- सर्वोच्च न्यायालय
-“पंकजा मुंडेंना विधानपरिषदेवर न घेणं हा माझ्यासाठी मोठा धक्का होता”
-‘मला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला येऊ नका तर…’; राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन