मुंबई | केंद्र सरकार रेल्वे देण्यास तयार आहे त्यामुळे पायी जाण्यापासून तत्काळ रोखावं आणि केंद्र सरकारशी समनव्य साधून त्यांना रेल्वेने प्रवास करता येईल अशी व्यवस्था करावी, अशी विनंती विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला केली आहे.
अजूनही बरेच कामगार बांधव रस्त्याने पायीच प्रवास करताना दिसत आहेत. बहुतेक शहरांमधून पुढे येत असलेले हे चित्र अतिशय विदारक आणि सुन्न करणारे आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
औरंगाबाद रेल्वे दुर्घटनेनंतर तरी किमान यातून बोध घेण्याची नितांत गरज असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसेच यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री पियूष गोयल यांच्याशी चर्चा केली असून 10 रेल्वेगाड्या मुंबईतून उत्तर प्रदेशला जाणार असल्याचं सांगितलं आहे.
सर्व कामगार बांधवांनी स्वतःची नोंदणी करून शासकीय व्यवस्थेतून प्रवास करावा. कृपया पायी चालत जाऊ नये, अशी विनंती फडणवीस यांनी केली आहे.
केंद्रीय मंत्री मा. श्री पीयूष गोयल जी से चर्चा की।
उनका बहुत बहुत आभार!
उन्होंने तुरन्त उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री श्री योगीजी से चर्चा की और जल्द ही मुंबई से १० ट्रेन (रेल गाड़ियाँ) उत्तरप्रदेश के लिए रवाना होगी.#IndiaFightsCorona @PiyushGoyal @myogiadityanath— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 9, 2020
सभी श्रमिक भाइयों को मेरा अनुरोध है की खुद का पंजीयन कर सरकार के माध्यम से अपना सफ़र करे, ना की पैदल चल कर… #IndiaFightsCorona
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 9, 2020
माझी सर्व कामगार बांधवांना विनंती आहे की, त्यांनी स्वतःची नोंदणी करून शासकीय व्यवस्थेतून प्रवास करावा.
कृपया पायी चालत जाऊ नये. #IndiaFightsCorona— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 9, 2020
महत्वाच्या बातम्या-
-लॉकडाऊनमुळे राज्यभरात अडकलेल्या नागरिकांना ST मोफत गावी पोहोचवणार; ‘या’ अटींसह प्रवास शक्य
-80 वर्षीय वडिलांना खांद्यावर घेऊन मजुराचा मुलुंड ते वाशिम 350 किमी पायी प्रवास
-काही लोकांनी माझ्या मृत्यूसाठी प्रार्थना केली पण…- अमित शहा
-“गुजरातमधून कोरोना हद्दपार करायचा असेल, तर मुख्यमंत्र्यांना हटवा”
-नागरिकांनो घाबरू नका; भारत कुठल्याही परिस्थितीला तोंड देण्यास तयार-डॉ. हर्षवर्धन