महाराष्ट्र मुंबई

भाजपमध्ये वरिष्ठ नेते असतील, पण मी… नारायण राणेंनी भाजप नेत्यांना सुनावलं

मुंबई | माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची केलेली मागणी ही आपली वैयक्तिक असून पक्षाची भूमिका नसल्याचं स्पष्ट केलं आहे. तर भाजप नेते सुधीर मुनगुंटीवार यांनी सध्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू कऱण्याची परिस्थिती नाही, असं म्हटलं आहे.

सुधीर मुनगुंटीवार यांना मी विचारत नाही. कोणी मला सांगावं असंही नाही. हे सरकार लोकांना वाचवण्यात अपयशी आहे. महाराष्ट्राच्या जनतेला वाचवा अशी मागणी मी केंद्र सरकार आणि राज्यपालांकडे केली आहे. मी भाजपच्या नेत्यांना विचारायला गेलेलो नाही. ते वरिष्ठ असतील, पण मीदेखील माजी मुख्यमंत्री आहे. मी काय काल राजकारणात आलेलो नाही, असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे. तसेच राणेंनी यावेळी शिवसेना नेते संजय राऊतांवर देखील टीकास्त्र सोडलं आहे.

संजय राऊत बेताल बोलत असतात. शिवसेनेत तरी आपली औकात आहे का हे संजय राऊत यांनी तपासावं. आत्मपरीक्षण करावं. संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील अपयशावर बोलावं. मुंबईत हजारो रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत त्याचं उत्तर द्यावं, असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, रुग्णाला वाचवू, कोणालाही मरु देणार नाही अशी बोलण्याची धमक एकाही नेत्यात नाही, अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-राज ठाकरेंचं राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना पत्र; केली ‘ही’ मागणी

-महाराष्ट्रात आमचा सरकारला पाठिंबा, पण…- राहुल गांधी

-चार वाजता काय होणार? फडणवीसांच्या ‘या’ कृतीकडे साऱ्या महाराष्ट्राचं लक्ष!

-“पॅकेजची रिकामी खोकी व विरोधकांची रिकामी डोकी, एकदा गुजरातची अंधारकोठडी बघायला जा”

-‘कठोर निर्णय, धडक अंमलबजावणी’, नागपुरात कोरोना नियंत्रणाचा तुकाराम मुंढे पॅटर्न!