शाळा सुरु करण्यासंबंधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

नवी दिल्ली | शाळांचं शैक्षणिक वर्ष सुरू करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे. प्रायोगिक तत्त्वावर डिजिटल पद्धतीने शाळा सुरु करण्यात येणार आहे. तर कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या तसंच ग्रामीण आणि तुलनेने दूरच्या शाळांमध्ये पुरेशी काळजी घेऊन प्रत्यक्ष शाळा सुरू करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून शालेय शिक्षण विभागासोबत बैठक पार पडली. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड बैठकीत उपस्थित होत्या. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

15 जून रोजी शैक्षणिक वर्ष सुरू होणार असल्याचं यापूर्वी जाहीर करण्यात आलं होतं. शिक्षकांना शाळेत हजर राहण्याच्या आदेश देण्यात आले होते.

दरम्यान, शाळेचा पहिला दिवस सुरु होत असताना शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी शाळांमध्ये हजेरी लावली. मात्र शिक्षण विभागाकडून पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत शैक्षणिक कामकाज करण्यात येऊ नये, असे आदेश देण्यात आलेत.

महत्वाच्या बातम्या-

-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सासरे माधव पाटणकर यांचं निधन

-“माझ्या वडिलांची काळजी घ्या, मी लवकरच पाटण्याला येईन….”

-सुशांतच्या लग्नाची तयारी सुरू होती, त्याचे कुटुंबिय त्याच्या लग्नासाठी मुंबईला येणार होते पण…

-हात जोडून सांगतो… द्वारकारनाथ संझगिरी यांची कोरोनाबद्दल काळजाचा थरकाप उडवणारी पोस्ट

-देशात कोरोनाचा कहर सुरूच… पाहा कालच्या दिवसांतली धक्कादायक आकडेवारी