खासगी रुग्णालयात होणारी रुग्णांची लूटमार थांबवण्यासाठी ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

मुंबई | राज्यात एकीकडे कोरोनाचे रुग्ण वाढत असताना काही खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांना भरमसाट बिलं देऊन लूटमार केल्या जात असल्याच्या तक्रारी आल्यानंतर राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

राज्य सरकारने खासगी रुग्णालयांमधील 80 टक्के खाटा ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे. 31 ऑगस्टपर्यंत राज्य सरकारकडे हा ताबा असणार आहे. याशिवाय राज्य सरकारने उपचार खर्चाची मर्यादाही ठरवून दिली आहे.

राज्य सरकारकडून हा आदेश जारी करण्यात आला आहे. यानुसार खासगी रुग्णालयांमधील 80 टक्के खाटांचा ताबा तसंच रुग्णाला किती बिल आकारलं जाणार हा निर्णय घेण्याचा अधिकार राज्य सरकारकडे असणार आहे. 20 टक्के खाटांसाठी दर आकारण्याचा अधिकार रुग्णालयांकडे राहणार आहे.

दरम्यान, विलगीकरण बेडसाठी चार हजार रुपये आकारले जाणार आहे. तसंच व्हेंटिलेटरशिवाय असणाऱ्या आयसीयू बेडसाठी 7500 तर व्हेंटिलटर सपोर्ट असणाऱ्या आयसीयू बेडसाठी 9000 रुपये आकारले जाणार आहेत. याशिवाय राज्य सरकारने इतर 270 प्रक्रिया आणि शस्त्रक्रियांसाठीचे दरही ठरवले आहेत.

 

 

महत्वाच्या बातम्या-

-“घराचं रणांगण फक्त कौरवांनी केलं होतं आणि आज भाजपने”

-मुंबईत ‘या’ रेल्वे स्थानकांवर आरक्षित गाड्यांसाठी तिकीट काऊंटर सुरु

-कोरोनाबाबत शासनानं काहीच न करता विरोधकांना सहकार्य करायला सांगणं चुकीचं- चंद्रकांत पाटील

-आनंदाची बातमी… पुण्यात पहिली प्लाझ्मा थेरपी यशस्वी, पुणेकरांना दिलासा!

-अमेरिकेचा चीनला सर्वांत मोठा दणका; ट्रम्प यांची मोठी खेळी