सध्याच्या घडीला मुंबईत येण्याची हिंमत माझ्यात नाही- नितीन गडकरी

नागपूर | देशातील सर्वात जास्त कोरोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात आहे. त्यातही महाराष्ट्रात मुंबई एक मुख्य हॉटस्पॉट आहे. यावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

सध्याच्या घडीला मुंबईला येण्याची हिंमत माझ्यात नाही, असं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. कोरोनानंतर लघु उद्योग तसंच पायाभूत सुविधा कशा पद्दतीने विकासाचा पाया रचण्यात महत्त्वाची भूमिक निभाऊ शकतात यावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

मुंबईत येण्याची हिंमत माझ्यात नाही. पण ही परिस्थिती नक्की बदलेल असा मला विश्वास आहे, असं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, सर्वात जास्त कोरोनाबाधित रुग्ण मुंबईत आहेत. मुंबईतील एकूण बाधितांची संख्या 59 हजार 201 वर गेली आहे. तर मृतांची संख्या 2248 वर गेली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-भारत-चीनच्या सैन्यात चकमक; भारताच्या एका कर्नलसह दोन जवान शहीद

-“यशराज फिल्म्स आणि सलमान खानने अनेकांना उद्ध्वस्त केलं, चौकशी करा”

-“…तेव्हा हे कलाविश्व अत्यंत क्रूर आणि निर्दयी होत जातं”

-“सुशांतनं 7 फिल्म साईन केल्या होत्या, 6 महिन्यात सर्व काढून घेण्यात आल्या”

-सामनातून काँग्रेसवर टीका केल्यानंतर आता संजय राऊत म्हणतात…