…म्हणून रितेश देशमुख कोरोनाग्रस्त रुग्णावर संतापला

मुंबई | करोना विषाणूने जगभरात हातपाय पसरल्यामुळे सर्वत्र दहशतीचं वातावरण आहे. भारतातदेखील 100 पेक्षा जास्त करोनाचे रुग्ण आढळून आले आहेत.  सध्या या रुग्णांवर उपचार सुरु असून यातील 11 जणांनी रुग्णालयातून पलायन केल्याचं समजत होतं. या पलायन केलेल्या कोरोनाग्रस्तांवर अभिनेता रितेश देशमुख चांगलाच संतापला आहे.

हे अत्यंत बेजबाबदारपणाचं लक्षणं आहे. सरकार आणि वैद्यकीय अधिकारी तुमची मदत करत आहे. त्यांना ती करु द्या. या आजारामुळे जर तुम्हाला एकटं रहावं लागत आहे. तर ते तुम्ही तुमच्यासाठी, तुमच्या मित्रपरिवारासाठी, घराताल्यांसाठी करतायं. त्यामुळे येथे तुमच्यावर योग्य उपचार होतील, असं रितेशनं म्हटलं आहे.

आपण सारेच सध्या सैनिक आहोत आणि या विषाणूविरुद्धची लढाई आपल्या सगळ्यांना एकत्र मिळून लढायची आहे. इंडिया युनाइटेड, असं रितेश आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, देशाचा एक नागरिक म्हणून आपल्याला सतर्क होण्याची गरज आहे. त्यामुळे असा बेजबाबदारपणा न करता परिस्थितीचं भान राखत सरकारची मदत करायला हवी, असं अभिनेत्री बिपाशा बासूने म्हटलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

-राजभवनाच्या भिंतींना वाचाळ तोंड आहे हे मलिक यांनी उघड केलं- शिवसेना

-#corona | गर्दी टाळा नाहीतर…; मुख्यमंत्र्यांचा मुंबईकरांना इशारा

-कोरोनाचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांचा अनोखा उपक्रम

-कोरोनाचा फटका राज ठाकरेंनाही; मेळावा करावा लागला रद्द

-“सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्टी नाही मात्र कमी उपस्थितीत काम करण्याबाबत विचार”