तबलिगी जमातीचे लोक डाॅक्टरांवरच थुंकले; शिवीगाळ केल्याचाही आरोप

नवी दिल्ली | दिल्लीच्या निजामुद्दीनमध्ये आयोजित तबलिगी जमात मर्कझच्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या अनेकांना करोनाची लागण झाली आहे.यानंतर तबलिगी जमातच्या 167 सदस्यांना नॉर्थर्न रेल्वेच्या क्वारंटाइन सेंटरमध्ये हलवण्यात आलं आहे. मात्र यावेळी त्यांच्याकडून डॉक्टर आणि तिथे उपस्थित आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत असभ्य वर्तन केलं जात आहे. नॉर्थन रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी दीपक कुमार यांनी ही माहिती दिली आहे.

क्वारंटाइनमधील कर्मचाऱ्यांसोबत चुकीचं वर्तन केलं. इतकंच नाही तर ते सगळीकडे थुंकत होते. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी आलेल्या डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अंगावरही थुंकत होते. तसंच हॉस्टेल इमारतीच्या आजुबाजूला फिरत होते, अशी धक्कादायक माहिती दीपक कुमार यांनी दिली आहे.

तबलिगी जमात निझामुद्दीनच्या 167 लोकांना पाच बसेसमधून तुघलकाबाद क्वारंटाइन सेंटरमध्ये आणण्यात आलं होतं. रात्री 9 वाजून 40 मिनिटांच्या सुमारास ते पोहोचले होते. यामधील 97 जणांना डिझेल शेड ट्रेनिंग स्कूल क्वारंटाइन सेंटरमध्ये ठेवण्यात आलं तर 70 जणांना आरपीएफच्या क्वारंटाइन सेंटरमध्ये जागा देण्यात आली आहे पण सकाळपासूनच हे लोक असभ्य वर्तन करत आहेत. जेवणाच्या अवास्तव मागण्या करत असल्याचं दीपक कुमार यांनी सांगितलं.

दरम्यान, तबलिगी मर्कझने आयोजित केलेल्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या 50 जणांना करोनाची लागण झाली असल्याचं स्पष्ट झालं आहे. फक्त दिल्लीच नाही तर देशभरातील अनेक मुस्लीम या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

महत्वाच्या बातम्या –

-जमत नसेल तर घरी जा, हॉस्पिटलला उकिरड्याची अवकळा पाहून तुकाराम मुंढेंचा संताप

-मरकजच्या कार्यक्रमाचा देशभरात परिणाम झाला, तो कार्यक्रम टाळता आला असता- शरद पवार

-“आंबेडकर जयंतीला बाबासाहेबांचे स्मरण करुया, त्यांच्या योगदानाची आठवण करुया”

-तबलिगी जमातीच्या लोकांनी माफी मागावी- हुसेन दलवाई

-युवी अन् भज्जीने मदतीचं आवाहन केलं पण पाकच्या शाहिद आफ्रिदी फाऊंडेशनसाठी; नेटकऱ्यांनी धरलं धारेवर