लॉकडाउनच्या काळात महाराष्ट्र सोडून जाणाऱ्या परप्रांतीयांना राज ठाकरेंनी खडसावलं, म्हणाले…

मुंबई | महाराष्ट्रावर संकट आलेलं असताना परराज्यातील लोकं ज्या राज्यामध्ये पैसे कमवले त्या राज्याला संकटात टाकून आपल्या राज्यात जाण्याचा विचार करत असतील तर ते चुकीचं आहे, असं मत  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे.

ज्या राज्यामध्ये इतके वर्ष राहिले त्या राज्याचे न होता संकटकाळी तुम्हाला तुमचे राज्य आठवत असेल तर हे पूर्णपणे चुकीचं आहे, असं राज ठाकरे यांनी आहे. एका वृत्तवाहिनीला महाराष्ट्र दिनानिमित्त दिलेल्या मुलाखतीमध्ये ते बोलत होते.

महाराष्ट्रात राहून पैसे कमवले आणि संकट आल्यावर निघून जातात. आता हे लोकं निघून गेल्यावर यांची कामं कोण करणार. महाराष्ट्राने परराज्यातून येणाऱ्या लोकांवर अलंबून राहण्यावर विचार करण्याची गरज आहे, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

परप्रांतीयांनी महाराष्ट्रात येऊ नये असं माझं म्हणणं नाही. मात्र आधी मान खाली घालून येणार आणि नंतर मान वर करुन दादागिरी करणार हे चालणार नाही. खपवून घेतलं जाणार नाही, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-जनता हीच राज्य आणि देशाची संपत्ती, ती वाचली पाहिजे- उद्धव ठाकरे

-हो, मी पुरावे बघितलेत, वुहानच्या लॅबमधूनच कोरोनाची उत्पत्ती- डोनाल्ड ट्रम्प

-“आता मुखपत्रातून नव्या जोमाने पंतप्रधानांचा शेलक्या भाषेत उल्लेख सुरु करा”

-चीनला अद्दल घडवण्यासाठी अमेरिकेचे नौदल दक्षिण चीन समुद्रात घुसले!

-3 मे रोजी लॉकडाउन संपणार का?; उद्धव ठाकरेंनी केलं स्पष्ट