रामदास आठवलेंचं राज ठाकरेंवर टीकास्त्र; म्हणाले…

मुंबई | मरकजमध्ये जो प्रकार घडला, अशा लोकांना गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे. यांना जगवायचं कशाला? असा सवाल करत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी संताप व्यक्त केला होता. मात्र राज ठाकरेंच्या गोळ्या घालण्याच्या भाषेला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी विरोध केला आहे.

राज ठाकरेंसारख्या जबाबदार नेत्याला अशी असंवैधानिक भाषा शोभत नसल्याचं रामदास आठवलेंनी म्हटलं आहे. तबलिगिंनी केलेल्या गर्दीचं आम्ही समर्थन करत नाही. त्या प्रकरणी चौकशी आणि कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. गोळ्या घालायच्यात तर पाक मधील अतिरेक्यांना घाला, असं ट्विट आठवलेंनी केलं आहे.

राज ठाकरेंनी आपल्या नेहमीच्या शैलीत मरकज कार्यक्रमाचा समाचार घेत, गोळ्या घालण्याची भाषा केली. मात्र राज ठाकरेंची भाषा असंवैधानिक असल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान, लॉकडाऊन पाळा, हे प्रकरण वाढलं तर लॉकडाऊन वाढेल, त्यामुळे यंत्रणेवर ताण येईल, कर मिळणार नाही, उद्योग बंद राहतील, मंदी येईल, हे सगळं तुमच्या एका चुकीने होईल, असं राज ठाकरेंनी म्हटलं होतं.

 

महत्वाच्या बातम्या-

-‘माझ्या या प्रश्नांची उत्तर द्या’; दिवे पेटवण्यावरून कुमारस्वामींनी दिलं मोदींना आव्हान

-कोरोनाचा असाही परिणाम; गंगामाई घेऊ लागली आहे मोकळा श्वास!

-कोरोनाविरोधी लढ्यासाठी मोदी सरकारचा नवा प्लॅन!

-दर्यादिल दादा… लॉकडाऊन काळात 10 हजार लोकांच्या जेवणाची जबाबदारी उचलली

-विराट कोहली अन् रो’हिट’ शर्माचा पंतप्रधान मोदींना पाठिंबा; केलं हे आवाहन