“मजुरांनी गावाकडं जाण्याचा प्रयत्न करु नये, त्यांची सर्व व्यवस्था केली जाईल”

मुंबई | राज्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे 30 एप्रिलपर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर शहरांमध्ये अडकून पडलेल्या लोकांनी गावांकडे स्थलांतर करु नये. ते जिथे आहेत तिथेच त्यांच्या राहण्या-खाण्याची व्यवस्था केली जाईल, असं आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्यातील जनतेला केलं आहे.

मजुरांनी गावाकडे परतण्याचा प्रयत्न करु नये, त्यांनी आहे तिथेच रहावं. शासनाच्यावतीनं सर्वांची राहण्याची सोय, पुरेसे अन्न देण्याची आम्ही हमी देतो, असं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.

केवळ आपलं राज्य, देश नव्हे तर संपूर्ण जगावर सध्या कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत जर कोणी गावी परतण्याचा प्रयत्न केला तर कदाचित त्यांना वाटेतच अडवलं जाईल, असंही अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे.

इतकी पायपीट करुन गावात जाऊनही जर गावातील लोकांनी प्रवेश दिला नाही तर आपल्यावर अधिक कठीण प्रसंग ओढवू शकतो. त्याचबरोबर कोरोनाच्या साथीला बळी पडण्याचा धोकाही वाढेल, असं अनिल देशमुख यांनी सांगितलंय.

महत्वाच्या बातम्या –

-चंद्रकांत पाटलांविरोधात राष्ट्रवादी युवकची ‘उघडा डोळे बघा नीट’ मोहिम!

-पुण्यात दोन कोरोनाबाधित महिलांचा मृत्यू, मृतांची संख्या 31 वर

-दादा, कोरोनाचा धोका साठीच्या वरील लोकांना जास्त उद्भवतो, काळजी घ्या- जयंत पाटील

-राज्यात 134 नवे कोरोना रुग्ण; आकडा 1895 वर

-अशा वेळीही तुम्हाला राजकारण सुचतंय, याचं मला कौतुक वाटतं; जयंत पाटलांचा चंद्रकांतदादांना टोला