‘बायकोने ऑफिसमध्ये फोन करून चौकशी केली तर….’; न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

नवी दिल्ली | ऑफिसमध्ये वारंवार फोन करून नवऱ्याची चौकशी करणं बायकोला चांगलंच महागात पडू शकतं. बायको येण्या-जाण्याच्या वेळा विचारत असेल आणि चौकशी करत असेल तर हा पतीचा मानसिक छळ मानला जाईल.

हरयाणा हायकोर्टात असंच काहीसं एक प्रकरण आलं होतं. गुरूग्राम फॅमिली कोर्टाने या प्रकरणात घटस्फोटास परवानगी दिली होती. ज्याला पत्नीने हायकोर्टात चॅलेंज केलं होतं. मात्र हाय कोर्टाने कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला.

आपला पती वुमनायजर आणि दारूडा असल्याचं तिने त्याच्या ऑफिसात पसरवलं होतं. पतीचं ते कृत्य क्रूर असल्याचं मानलं जाईल, कारण यामुळे पतीची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, असं हायकोर्टाने सांगितलं.

पत्नीने सांगितलं की, ती मुलांच्या सुरक्षित भवितव्यासाठी असं करीत होती. मात्र तिच्या या स्पष्टीकरणामुळे पतीची प्रतिष्ठा पुन्हा येऊ शकत नसल्याचंही वकिलांनी सांगितलं. हायकोर्टाचे न्यायमूर्ती रितू बाहरी आणि न्यायमूर्ती अशोक कुमार वर्मा यांच्या खंडपीठाने पत्नीने दाखल केलेली याचिका फेटाळली.

दरम्यान, 20 मार्च 2017 रोजी गुडगावमध्ये एका कौटुंबिय न्यायालयाने मानसिक क्रूरतेच्या आधारावर घटस्फोट मंजूर केला होता. या दाम्पत्याचं लग्न 1996 मध्ये झालं होतं आणि दोन मुलांचा जन्म 1997 आणि 1999 मध्ये झाला होता.

पतीचा गार्मेंट एक्सपोर्टचा बिजनेस होता. यामुळे त्याला देश-परदेशात नेमकी प्रवास करावा लागत होता. त्यामुळे पत्नी नेहमी त्याच्यावर संशय घेत होती.

महत्त्वाच्या बातम्या-

“देवेंद्र फडणवीस झोपेतही बडबडतात, अन् बेडवरून खाली पडतात” 

 Russia-Ukraine War | युद्ध आणखी भडकणार?, ‘या’ देशाची युक्रेनला मोठी मदत

 “कोल्हापूरच्या रूग्णालयात मला मारून टाकण्याचा डाव होता”

 देवेंद्र फडणवीसांचा आणखी एक पेन ड्राईव्ह बाॅम्ब, म्हणाले…

  “दोन हात करायची वेळ आली तर आम्ही देखील कमी पडणार नाही”