Top news देश

सर्वात मोठी बातमी! काश्मीरमध्ये हिंसाचार घडवणाऱ्या यासिन मलिकला कोर्टाकडून जन्मठेपेची शिक्षा

Yasin Malik e1653488069640

नवी दिल्ली | अनेक वर्षांपासून अतिरेकी कारवायांना खतपाणी घालणाऱ्या यासिन मलिकला जन्मठेपेची शिक्षा सुनावली (Yasin Malik ) आहे.
यासिन मलिकला आज शिक्षा सुनावण्यात येत होती. तर दुसरीकडे जम्मू-काश्मीरची राजधानी असलेल्या श्रीनगरमध्ये यासिनच्या समर्थकांनी अराजकता माजवायला सुरुवात केली.

श्रीनगरमध्ये यासिनच्या काही समर्थकांनी दगडफेक केली. यासिनच्या घराबाहेर त्याच्या समर्थकांनी घोषणाबाजी केली. सध्याच्या घडामोडी पाहता जम्मू-काश्मीर पोलीस, सैन्यदल, सीआयएसएफचे जवान श्रीनगरच्या प्रत्येक गल्लोगल्लीत लक्ष ठेवून आहेत.

याआधी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने एनआयएला यासीन मलिकची आर्थिक स्थिती जाणून घेण्यास सांगितलं होतं. एवढंच नाही तर न्यायालयाने यासीन मलिकला त्याच्या मालमत्तेबाबत प्रतिज्ञापत्र देण्यास सांगितलं होतं.

2017 मध्ये यासीन मलिकवर UAPA कायद्यांतर्गत दहशतवादी कृत्यांमध्ये सहभाग, दहशतीसाठी पैसे गोळा करणे, दहशतवादी संघटनेचा सदस्य असणे असे गंभीर आरोप होते.

दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने फुटीरतावादी यासिन मलिकला टेरर फंडिंग प्रकरणात दोषी ठरवलं आहे. याआधी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने एनआयएला यासीन मलिकची आर्थिक स्थिती जाणून घेण्यास सांगितलं होतं.

एवढंच नाही तर न्यायालयाने यासीन मलिकला त्याच्या मालमत्तेबाबत प्रतिज्ञापत्र देण्यास सांगितलं होतं. याच महिन्यात यासीन मलिकने दहशतवादी कारवायांमध्ये सामील असल्याची कबुली दिली होती.

महत्त्वाच्या बातम्या- 

काँग्रेसला सर्वात मोठा धक्का; ‘या’ ज्येष्ठ नेत्याचा पक्षाला रामराम 

महागाईने त्रस्त नागरिकांसाठी आनंदाची बातमी; सरकारचा आणखी एक मोठा निर्णय 

“मंदिर जेवढं जुनं आहे तितकीच…”; ज्ञानवापी प्रकरणावर शरद पवारांचं मोठं वक्तव्य 

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना पुढील 4 दिवस पाऊस झोडपून काढणार