कोरोनावर उपाय सुचवा, 42 लाख रूपये कमवा; केंद्र सरकारचं चॅलेंज

नवी दिल्ली |  संपूर्ण मानवजातीने कोरोनासमोर हात टेकले आहेत. प्रगत राष्ट्रांसह भारतही कोरोनाला कंटाळला आहे. त्याच्यावर लस शोधण्यासाठी सर्वांकडूनच प्रयत्न केले जात आहे. अशातच करोनावर मात करण्याची कल्पना सुचवा आणि इनाम जिंका, असं आवाहन केंद्र सरकारने केलं आहे.

ऑल इंडिया काउंसिल फॉर टेक्निकल एजुकेशन आणि केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने एकत्रितपणे हे चॅलेंज सुरू केलं आहे. ज्यांच्या कल्पनांची निवड होईल त्यांना 42 लाखांचं बक्षिस मिळणार आहे.

27 आणि 28 मार्च रोजी या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं आहे. 27 आणि 28 तारखेला आलेल्या एन्ट्रीजचे परीक्षण केलं जाईल. सर्वांत चांगल्या आयडियाला पारितोषिक दिलं जाईल.

दरम्यान, विजेत्या आयडिया देणाऱ्या विद्यार्थ्याला, शिक्षणतज्ज्ञाला 2 लाख रुपये रोख बक्षिस मिळणार आहे. याव्यतिरिक्त ज्यांची सर्वांत चांगली आयडिया निवडली जाईल त्यांना 40 लाख रुपये दिले जातील.

 

महत्वाच्या बातम्या – 

-बेघर, रस्त्यावर राहणाऱ्यांसाठी ‘कम्युनिटी किचन’ योजना राबवणार- अजित पवार

-कर्जावरील व्याज आकारणी थांबवा, इएमआयवर 6 महिन्यांसाठी बंदी घाला ; सोनिया गांधींनी मोदींना लिहिलं पत्र

-लॉकडाऊनमुळे त्रस्त झालेल्या जनतेसाठी उद्धव ठाकरेंनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

-कर्मचारी वर्गाला मोठा दिलासा; मोदी सरकारने केली ही मोठी घोषणा

-बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू मदतीसाठी पुढे सरसावली; केली 5 लाखांची मदत