खळबळजनक! गुजरातमध्ये कोरोना रुग्णाचा मृतदेह बस स्टँडवर आढळला

गांधीनगर | गुजरातमध्ये खळबळजनक घटना समोर आली आहे. एका कोरोना रुग्णाचा मृतदेह चक्क बस स्टँडवर आढळला असल्याची माहिती आहे. या प्रकरणी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी चौकशीचे आदेश दिल्याचं कळतंय.

67 वर्षीय वडिलांना 10 मे रोजी अहमदाबाद सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होत. त्यानंतर दोन दिवसांनी त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचा रिपोर्ट आला होता. 15 मे रोजी आम्हाला पोलिसांचा कॉल आला. त्यांनी सांगितलं की, अहमदाबादमधील दनिलिम्डा क्रॉसिंगजवळील बस स्टँडवर तुमच्या वडिलांचा मृतदेह आढळला आहे, असं मृत रुग्णाच्या मुलानं सांगितलं आहे.

या रुग्णाला फार क्वचित प्रमाणात कोरोनाची लक्षणे होती आणि नियमानुसार त्यांना  घरी राहण्यास सांगण्यात आलं होतं. त्यामुळे त्यांना 14 मे रोजी डिस्चार्ज देण्यात आला होता. जेव्हा त्यांना डिस्चार्ज देण्यात आला, तेव्हा त्यांची प्रकृती ठीक होती, असं अहमदाबाद सरकारी रुग्णालयाचे अधिकारी डॉ. एम.एम. प्रभाकर यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, रुग्णालयाच्या वाहतूक व्यवस्थेद्वारे त्यांना घरी सोडण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, घरापर्यंत जाण्यामध्ये खूप ट्राफिक होते. त्यामुळे त्यांना घराजवळील बस स्टँडवर सोडण्यात आले. पण त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या डिस्चार्जबद्दल माहिती दिली होती की नाही, हे आताच सांगता येणार नाही, असं प्रभाकर म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-“संज्या म्हणतो ग्राउंड ताब्यात घ्या, आदित्य म्हणतो पावसाने बेड भिजतील; असले राज्यकर्ते….?”

-मजूर आणि कामगारांना आमचं सरकार वाऱ्यावर सोडणार नाही, ते आमची जबाबदारी- अरविंद केजरीवाल

-‘श्रीमंत देश लॉकडाउन वाढवू शकतात, पण गरीब देश…’; चेतन भगतचा सरकारला टोला

-“आम्ही मोदींसारखे ड्रामेबाज नाही, जेव्हा मत हवं असतं तेव्हा ते मजुरांचे पाय धुतात”

-केंद्राने जाहीर केलेले पॅकेज म्हणजे ‘खोदा पहाड, निकला जुमला’; अशोक चव्हाणांची सडकून टीका