‘परप्रांतीयांच्या जाण्याने रिक्त जागांवर रोजगाराची संधी साधा’; शिवेंद्रराजेंचं स्थानिकांना आवाहन

सातारा | परप्रांतीय कामगारांच्या जाण्याने रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. तरी, स्थानिकांनी या संधीचं सोनं करून विविध कंपन्यांमध्ये आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी मिळवावी आणि बेरोजगारीला आळा घालावा, असं आवाहन आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी केलं आहे.

रोजगार उपलब्ध नाही, नोकरी मिळत नाही, परप्रांतीयांमुळे औद्योगिक वसाहतींमध्ये स्थानिकांना नोकरी नाही, त्यामुळे स्थानिक तरुणांना रोजगारासाठी पुणे, मुंबईवरून अवलंबून राहावे लागते, असे आपण नेहमीच ऐकत असतो, पण आज वेगळी स्थिती आहे, असं शिवेंद्रराजे भोसले यांनी म्हटलं आहे.

साताऱ्यातूनही हजारो परप्रांतीय त्यांच्या राज्यात परतले आहेत. त्यामुळे सातारा एमआयडीसीतील विविध कंपन्यांमध्ये टर्नर, फिटर, हेल्पर, मशिन ऑपरेटर, गवंडी, सुतार अशा अनेक पदांच्या असंख्य जागा रिक्त आहेत. विविध वाहतूक संस्थांमध्ये वाहनचालकांची असंख्य पदे रिकामी आहेत. यामुळे चालून आलेल्या संधीचा स्थानिक भूमिपुत्रांनी लाभ घ्यावा, असं शिवेंद्रराजे भोसलेंनी सांगितलं आहे.

दरम्यान, कंपन्यांनाही कामगारांची गरज आहे. त्यामुळे बेरोजगार तरुणांनी कोरोनामुळे निर्माण झालेल्या या संधीचा फायदा घ्यावा, असं आवाहन शिवेंद्रराजेंनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-निलेश राणेंविरोधात तृतीयपंथी समाजाकडून गुन्हा दाखल; जाणून घ्या कारण…

-‘धारावी पुनर्विकासाला चालना देण्याची हीच वेळ’; जितेंद्र आव्हाड यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

-अशोक मामांनी पुन्हा जिंकली मनं; पोलीस कर्मचाऱ्यांना दिली ‘ही’ खास भेट

-‘तुझ्या गव्हाच्या कापणीला मी स्वत: ईळा घेऊन येणार’; प्रवीण तरडेंनी ‘त्या’ शेतकऱ्याला दिला शब्द

-कोरोना हे तिसरं महायुद्ध, चीनी वस्तूंवर बहिष्कार घालून धडा शिकवला पाहिजे- रामदास आठवले