कागदी शेर मैदानात ढेर! दक्षिण अफ्रिकेकडून भारताचा दारूण पराभव

मुंबई | भारत आणि दक्षिण अफ्रिका (INDvsSA) मालिकेतील आज पहिला एकदिवसीय सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात दक्षिण अफ्रिकाने भारताचा दारूण पराभव केला आहे.

दक्षिण अफ्रिकेने दिलेल्या 297 धावांचं आव्हान पार करताना कर्णधार केएल राहुल लवकर बाद झाला. त्याने केवळ 12 धावा केल्या. त्यानंतर गब्बर धवन आणि किंग कोहलीने भारतीय फलंदाजी सांभाळली. दोघांनी 92 धावांची भागेदारी केली.

शिखर धवन बाद झाल्यानंतर विराट कोहली देखील शम्शीच्या जाळ्यात अडकला. कोहलीने 51 तर धवनने 79 धावा केल्या. मात्र, त्यानंतर भारतीय संघ पत्त्यासारखं ढेपाळला.

रिषभ पंत, श्रेयस अय्यर आणि व्यंकटेश अय्यर झटपट बाद झाले. या तिन्ही फलंदाजांना काही खास कामगिरी करता आली नाही. अखेरीस लार्ड शार्दुलने भारतीय फलंदाजी संभाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, अखेर भारताला 31 धावांनी पराभव पत्करावा लागला आहे.

सामन्यात दक्षिण अफ्रिकेने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. चांगली सुरूवात भेटल्यानंतर बुमबुम बुमराहने मलनला बाद करत भारताला पहिला गडी बाद करून दिला.

त्यानंतर दक्षिण अफ्रिकेचे फलंदाज मैदानात टिकून राहिले. मार्करमला जास्त काही करता आलं नाही आणि 18 व्या षटकात 70 वर 3 बाद अशी अफ्रिकेची स्थिती होती. मात्र, कर्णधार बावूमा आणि रासी व्हॅन डर डुसेनने दक्षिण अफ्रिकेची फलंदाजी सावरली.

दोघांनी मिळून 200 धावांची भागेदारी केली. भारतीय गोलांदाजांचा दोघांनी चांगलाच समाचार घेतला. दोघांनी शतक झळकावली. बावूमाने 110 धावा केल्या. तर रासी व्हॅन डर डुसेनने 129 धावा केल्या.

अखेरच्या षटकात बावूमा फटकेबाजी केली आणि 50 षटकात 296 धावा केल्या आणि भारताला 297 धावांचं आव्हान दिलं होतं. भारताकडून बुमराहने 2 गडी बाद केले.

महत्त्वाच्या बातम्या – 

उर्फीचा अनोखा अंदाज! नेटकरी म्हणाले, “आधी नशा करणं बंद कर”

 मुख्यध्यापकाच्या ऑफिसमध्ये राडा, बोलता बोलता झालं असं की…; पाहा व्हिडीओ

रावसाहेब दानवेंना जोर का झटका; सोयगाव नगरपंचायतीत शिवसेनेनं मारली बाजी 

नारायण राणेंना शिवसेनेचा ‘दे धक्का’, शेवटच्या क्षणी एका आकड्याने… 

ज्युनिअर आर. आर. पाटलांचा धमाका, एकहाती सत्ता मिळवत विरोधकांना ‘बाप’ दाखवला!