कॅप्टन कूल धोनीच्या निवृत्तीवर विराट कोहली म्हणतो…

मँचेस्टर : भारतीय संघाला वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत पराभव पत्कारावा लागल्यानंतर यष्टीरक्षक, फलंदाज महेंद्रसिंह धोनी आपल्या निवृत्तीची घोषणा करणार असल्याची चर्चा रंगली होती.

महेंद्रसिंह धोनीने आपल्या भविष्याबाबत आम्हाला काहीही सांगितलं नाही, असं सांगत भारती संघाचा कर्णधार विराट कोहलीने धोनीच्या निवृत्तीचे वृत्त फेटाळून लावले आहे.

धोनीने न्यूझीलंडविरुद्ध 72 चेंडूत 50 धावा केल्या. धोनी बाद झाल्यानंतर भारताच्या विजयाच्या आशा संपुष्टात आल्या होत्या.

धोनीने एक बाजू लावून धरली म्हणून जाडेजाला दुसऱ्या बाजूने मोकळेपणाने खेळता आलं. त्याने परिस्थितीनुसार खेळ केला, असंही विराट कोहलीने सांगितलं.

कालचा दिवस आमचा होता. पण न्यूझीलंडच्या गोलंदाजांना विजयाचे श्रेय द्यायलाच पाहिजे. खेळपट्टीकडून त्यांना सुरेख मदत लाभली, असं विराट म्हणाला.

एकूण स्पर्धेत भारतीय संघ उच्च दर्जाचा क्रिकेट खेळला. दडपणाच्या स्थितीत न्यूझीलंडने जोश आणि होश राखला. तेव्हा त्यांचा या विजयावर हक्क आहे, असं म्हणत विराटने न्यूझीलंडचे कौतुक केले आहे.