कोरोनाच्या लढाईसाठी क्रिकेटच्या देवानेही केली 50 लाख रूपयांची मदत

मुंबई |  कोरोनाग्रस्तांसाठी आणि त्यावरच्या उपाययोजनांसाठी आर्थिक मदतीचा ओघ सुरु झाला. यात जनसामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत साऱ्यांनी शक्य तेवढी मदत करण्यास सुरुवात केली आहे. यातच हातभार म्हणून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यानेही 50 लाख रूपयांची मदत केली आहे.

सचिनने 25 लाख रूपयांची मदत पंतप्रधान रिलीफ फंडाला तर 25 लाख रूपये मुख्यमंत्री रिलिफ फंडात जमा केले आहेत. इंडिया टुडेने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

आत्तापर्यंत खेळाडूंमध्ये सचिनने सर्वाधित मदत केली आहे. याअगोदर इरफान पठाण आणि त्याचा भाऊ युसुफ पठाण यांनी मास्क वाटप केलं होतं. दुसरीकडे टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने देखील पुण्यातल्या एका संस्थेला मदत केली आहे. पी.व्ही.सिंधूने देखील फुल ना फुलाची पाकळी म्हणून काही निधी पंतप्रधान रिलीफ फंडाला दिला आहे.

दरम्यान, सचिनने ट्विटरवर जनजागृतीसाठी व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचं आवाहन तो करत आहे. तसंच नागरिकांनी आपल्या स्वत:ची तसंच आपल्या कुटुंबियांची काळजी घेण्याचं आवाहन करताना सुद्धा तो दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या –

-अजित पवारांचं सैन्य दलाला पत्र; लोकांनो आता तर घराबाहेर पडूच नका…!

-फोन लावायचा होता आढळरावांना लागला अजितदादांना, ‘दादां’नी केलं झटक्यात काम!

-‘कोरोनाचं संकट अत्यंत गंभीर आहे, अर्थव्यवस्थेवर याचा दीडवर्ष परिणाम होणार”

हीच ती वेळ, देवस्थानांनीही आपली दानपेटी समाजासाठी खुली करावी- रोहित पवार

-फक्त लॉकडाऊन करून चालणार नाही तर…; रघुराम राजन यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला