Top news खेळ

“मला काहीही सिद्ध करण्याची गरज नाही”, किंग कोहलीचं रोखठोक उत्तर

Virat Kohli 1

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून भारतीय संघातील कथित वाद आता प्रकर्षाने समोर येताना दिसत आहे. अशातच आता भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat kohli) सध्या वादाच्या भोवऱ्या आहेत.

भारतीय एकदिवसीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्यात कथित वाद देखील समोर आला होता. अशातच विराट कोहली आणि बीसीसीआयमध्ये सर्वकाही अलबेल नसल्याचं समोर आलं होतं.

सध्या भारतीय संघ दक्षिण अफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. मंगळवारपासून केपटाऊनमध्ये तिसरी कसोटी खेळली जाणार आहे.

अशातच आता माध्यमांसमोर आलेल्या विराटने मीडियाच्या प्रश्नांची सडेतोड उत्तर दिलं आहे. त्यावेळी विराटला त्याच्या फलंदाजीवर उपस्थित करण्यात आला होता. त्यावर कोहली चांगलाच भडकल्याचं दिसून आलं.

माझ्या फलंदाजीवर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2014 च्या इंग्लंड दौऱ्यातही असा प्रकार घडला होता. मला माहित आहे की मी संघाच्या अत्यंत महत्त्वाच्या क्षणांचा एक भाग आहे, असं विराट म्हणाला आहे.

गेल्या वर्षभरात मी संघासाठी अनेक महत्त्वाच्या भागीदारींचा एक भाग आहे. मला कोणालाही काहीही सिद्ध करण्याची आवश्यकता नाही. बाहेरचे लोक काय म्हणतात हे माझ्यासाठी महत्त्वाचं नाही, असंही विराट म्हणाला आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून विराट कोहलीची बॅट तळपल्याचं दिसत नाही. मागील 2 वर्षापासून कोहलीने एकही शतक ठोकलं नसल्याने त्यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत होता. त्यावर आता कोहली मैदानात उत्तर देईल, अशी अपेक्षा आहे.

महत्वाच्या बातम्या –

लाईफ हो तो ऐसी! काहीही न करता लाखो कमवतोय ‘हा’ तरुण

‘अशी वेळ कधीच आली नव्हती, मी यापूर्वी अनेकदा…’, शरद पवार यांचं मोठं वक्तव्य

 सर्वांची झोप उडवणारी बातमी समोर; ओमिक्रॉननंतर सापडला डेल्टाक्रॉन व्हायरस

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय  

एलआयसीची जबरदस्त योजना; फक्त 260 रुपयांची गुंतवणूक अन् मिळवा 20 लाख