माजी कसोटीपटू माधव आपटे हे काळाच्या पडद्याआड

मुंबई |  माजी कसोटीपटू आणि उद्योजक माधव आपटे यांचं मुंबईत आज सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 1950 च्या दशकातील काळ आपटेंनी सलामीवीर म्हणून गाजवला होता.

माधव आपटे यांनी सन 1952 ते 1953 या कालावधीत 7 कसोटी सामन्यांमध्ये भारताचे कर्णधारपद भूषवलं. आपटेंनी ‘क्रिकेट क्लब ऑफ इंडिया’चे अध्यक्ष म्हणूनही जबाबदारी सांभाळलेली आहे. ते मुंबईचे नगरपालही होते.

माधव आपटेंनी लेग स्पिनर म्हणून आपल्या क्रिकेट कारकीर्दीला सुरुवात केली. मात्र विनू मंकड यांनी माधव आपटेंना सलामीवीर म्हणून खेळवलं.

1952 मध्ये पाकिस्तान विरोधात आपटेंनी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. पाच महिन्यांच्या कालावधीत ते सात कसोटी सामने खेळले. यावेळी त्यांनी एक शतक आणि तीन अर्धशतकं लगावली होती.

कसोटी मालिकेत एकूण 400 पेक्षा जास्त धावा करणारे माधव आपटे हे पहिले भारतीय सलामीवीर ठरले होते. 1953 मध्ये क्वीन्स पार्क ओव्हल कसोटीत त्यांनी 542 धावा ठोकल्या होत्या. 

महत्वाच्या बातम्या-