कांदळवनाची कत्तल करून पंचतारांकित क्लब उभारणाऱ्या भाजप आमदारावर गुन्हा दाखल

मुंबई | मुंबईतल्या मीरी रोडच्या कनकिया परिसरातल्या कांदळवनाची कत्तल करून सेव्हन-इलेव्हन हे पंचतारांकित क्लब उभारणारे भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उच्च न्यायालाच्या आदेशानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

सेव्हन-इलेव्हन हा क्लब उभारण्यासाठी कवडीमोल किमतीने स्थानिकांकडून जमीन खरेदी केल्याचा आरोप मेहतांवर आहे. पर्यावरणासंबंधीचे नियम धाब्यावर बसवून त्यांनी हा क्लब बनवला. या क्लबला बेकायदेशीर मान्यता देणारे पालिका आयुक्त आणि आधिकाराही आरोपीच्या पिंजऱ्यात आहेत.

नरेंद्र मेहता नेहमीचवादाच्या केंद्रस्थानी राहिले आहेत. त्यांच्या बेकायदेशीर कृत्यांविरोधात भाईंदरचे पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्ते धीरज परब गेली कित्येक वर्ष लढा देत आहेत.

परब यांनी वारंवार तक्रार करूनही पालिका प्रशासन किंवा पोलिस त्यांच्यावर कारवाई करत नव्हते. अखेर परब यांनी न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला. न्यायमूर्ती रणजीत मोरे आणि न्यायमूर्ती जमादार यांच्या खंडपीठाने पोलिसांच्या दिरंगाईबाबत नाराजी व्यक्त करत मेहतांवर तातडीने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, मेहतांवरच्या कारवाईमुळे मिरा-भाईंदर परिसरात चर्चांना उधाण आलंय.

महत्वाच्या बातम्या-